टाकळीभानला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी.

टाकळीभानला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील पुरातन यादव कालीन प्रती पंढरपूर ओळखल्या जाणार्या श्री.विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त श्री. विठ्ठलाच्या प्रांत अधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते पूजा व दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
टाकळीभान परिसरातील गावांचे श्रद्धास्थान असल्याने टाकळीभान व परिसरातील श्रीरामपूर, भोकर, खोकर, कमालपूर, घुमनदेव, वांगी, खिर्डी, गुजरवाडी, कारवाडी, बेलपिंपळगाव, पाचेगाव आदी ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी आले होते. श्रीरामपूर येथील गुड मॉर्निंग क्लबचे सदस्य, डॉक्टर, वकील, व्यावसायिक पायी दिंडी घेऊन तर सिद्ध समाधी योगग्रुपने श्रीरामपूर ते टाकळीभान सायकल दिंडी काढून विठ्ठलाचे दर्शन घेतले. टाकळीभान ग्रामपंचायत व लोकसेवा मंडळाच्या वतीने आलेल्या भाविकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
पहाटे ३.३० ते ४.३० यावेळेत अभिषेक
करण्यात आला. ४.३० ते ५.३० या वेळेत पूजा करण्यात आली.५.३० ते ६ वाजता प्रांताधिकारी अनिल पवार व सौ. सई पवार यांच्या हस्ते उत्सव मूर्तीची पूजा व आरती करण्यात आली.पुजेचे पौरौहित्य सुदाम देवळालकर यांनी केले. दुपारी १२ वाजता आरती झाली त्यानंतर भजन झाले. रात्री
८.३० ते १०.३० या दरम्यान ह. भ. प. चोरमले महाराज यांचे किर्तन झाले.
आरतीनंतर प्रांताधिकारी अनिल पवार व सौ.सई पवार यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सचिव नानासाहेब लेलकर, बापूसाहेब पटारे व मंदिराचे पुरोहित विजय देवळालकर यांनी सत्कार केला.
प्रांताधिकारी पवार म्हणाले, आज मला पूजा करण्याचा मान मिळाल्याने खुप आनंद झाला असून
पाऊसही समाधानकारक झालेला आहे व अजूनही पाऊस होवून हे विठ्ठला सर्वांना सुखी ठेव असे साकडे त्यांनी श्री विठ्ठलाला घातले.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष माजी सभापती नानासाहेब पवार, सचिव नानासाहेब लेलकर, गंगाधर
गायकवाड, बापूसाहेब पटारे, शिवसेनेचे जेष्ठ नेते राधाकृष्ण वाघुले, देवा कोकणे, लक्ष्मण भालसिंग, दिगंबर पांडे, भाऊसाहेब कोकणे, आबासाहेब ढुस आदींसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
टाकळीभान : येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त श्रीरामपूर प्रांताधिकारी अनिल पवार सर दांपत्य विठ्ठल रुक्माई ची पूजा करताना व दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी