मानोरी नवरात्र उत्सव निमित्त. दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

मानोरी नवरात्र उत्सव निमित्त. दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
मानोरी नवरात्र उत्सव निमित्त सातव्या माळेला श्री रेणुका भगवती संस्थान व सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट व तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्तविद्यमाने दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. करण्यात आले होते
श्री. रेणुका भगवती संस्थान व सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट मानोरी व तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज, आरडगाव आयोजित नवरात्र उत्सवामध्ये दांडिया नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी फनी गेम्स चे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री. रेणुका भगवती संस्थान व सार्वजनिक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब गेनुजी पाटील आढाव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वेदांता फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब मुसमाडे सर व सौ पुष्पाताई मुसमाडे मॅडम हे होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीला भक्तिमय वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानोरी व अंबिका माध्यमिक विद्यालय मानोरी हायस्कूलच्या मुलींनी गीतांवर नृत्य सादर केले.
त्यानंतर तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले त्यामध्ये एकूण आठ नृत्य सादर केले. त्यामध्ये
एकदंताय कमरिय ,ढोलीडा,चौगाडा थारा,नगाडे संग ढोल,लल्लाटी भंडार
गजानना, एकदंताय, या भक्तीमय गीतांवर नृत्य सादर केले.
तसेच महिलांसाठी फनी गेम्स चे आयोजन केले होते त्यामध्ये तळ्यात मळ्यात ,चेंडू फेकणे, टिकली लावणे, उखाणे, दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीस वितरण करण्यात आले
या कार्यक्रमासाठी श्री रेणुका भगवती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ,सर्व विश्वस्त मंडळ तसेच, गावातील धार्मिक शैक्षणिक राजकीय डॉक्टर वकील गावातील ग्रामस्थ महिला भगिनी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ,तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजचे पालक सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच तक्षज्ञ कॉलेज आरडगाव येथील प्राचार्य मा.जगदीश मुसमाडे सर कॉलेजचे प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे सर, प्रा. राहुल बोरुडे, प्रा.अफ्रोज सय्यद, प्रा. सागर वाघ, प्रा संतोष आनाप, प्रा.सुरज तनपुरे.प्रा. गौरी सूर्यवंशी, प्रा. गौरी म्हसे, प्रा. सोनाली शिरोळे, प्रा . अश्विनी खिलारी, प्रा. स्वाती कोबरने, शिक्षकेतर कर्मचारी हेड क्लार्क सलीम पठाण, आकाश बोर्डे, अमोल पवार सर मोठ्या संख्येने उपस्थित होते