नगरसेविका सीमाताई प्रशांत गोरे यांच्या मागणीला यश

नगरसेविका सीमाताई प्रशांत गोरे यांच्या मागणीला यश
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ सीमाताई प्रशांत गोरे यांनी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ शुभांगीताई मनोहरदादा पोटे यांच्याकडे दिनांक ११/०४/२०२२ रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी बायपास येथील मेहता यांच्या जागेतील गार्डनला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान असे नाव देण्यात यावे व बायपास येथे होणाऱ्या महात्मा फुले स्मारकास ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मिळावा अशा आशयाचे पत्र दिले होते त्या अनुषंगाने आज दिनांक ०४/०५/२०२२ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सदरचे विषय सभागृहाने मंजूर केले या ठरावाची सूचना नगरसेविका सीमाताई प्रशांत गोरे यांनी केली तर अनुमोदन नगरसेवक संतोष पोपटराव कोथिंबिरे यांनी दिले
या मागणीस नगराध्यक्ष शुभांगी ताई पोटे व सर्व सभागृहाने एकमताने मान्यता दिली
सदर ठराव मंजूर झाल्यानंतर नगरसेविका सौ सीमाताई प्रशांत गोरे व नगरसेवक संतोष पोपट कोथिंबीरे यांनी समाजाच्या वतीने नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे,मुख्याधिकारी मंगेशजी देवरेसाहेब व सर्व नगरसेवक यांचे आभार मानले