पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती तसेच ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांचा सत्कार राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राहुरी येथील रासप कार्यालयात संपन्न

पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती तसेच ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांचा सत्कार राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राहुरी येथील रासप कार्यालयात संपन्न
राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरदराव बाचकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प चोरमले महाराज शास्त्री होते यावेळी उपस्थित ह भ प पिसे महाराज,प्रा. गावडे सर, प्रा. संजय तमनर सर,पैलवान पंढरीनाथ तमनर,समता परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मछिंद्र गुलदगड, नारायण तमनर साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे,साई मल्टीस्टेट चे चेअरमन कपाळे साहेब हे होते प्रतिमेचे पूजन ह भ प चोरमले महाराज शास्त्री व मान्यवर यांच्या हस्ते झाले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्याबद्दलचे विचार रासप जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे,महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जऱ्हाड,सखाराम सरक लोकनियुक्त सरपंच नांदगाव उमेश बाचकर मा.सरपंच राहुरी खुर्द, प्रा संजय तमनर यांनी मांडले तसेच विविध कार्यकारि विकास सहकारी सेवा संस्थांचे नुकत्याच झालेल्या निवडनुकीतील नवनिर्वाचित संचालक व ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कार समारंभ करण्यात आला. नवनिर्वाचित संचालक रभाजी बाबुराव गावडे, राजेंद्र बाबुराव सोपान रामभाऊ गावडे,मोहन हरिभाऊ बनसोडे, बाळकृष्ण गोविंद गावडे सर,श्याम भिंगार दिवे,ज्ञानेश्वर भिंगार दिवे,मधुकर येवले, युसुफ शेख तसेच चिंचाळे विकास कार्यकारी सेवा संघाचे नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब ढाकणे फकीरा जोरी जालिंदर सांगळे ज्ञानेश्वर वडीतके विठ्ठल पवार नवनाथ कोळसे साहेबराव गडदे एकनाथ कोळसे दत्तात्रय गडदे नारायणराव तमनर यश सानप माजी सरपंच बाबासाहेब वडीतके तसेच नांदगाव लोकनियुक्त सरपंच सुनीताताई सरक ग्रामपंचायत सदस्य राहुरी खुर्द शिवाजी शेंडे,उमेशजी बाचकर माजी ग्रामपंचायत सदस्य राहुरी खुर्द, वरवंडी सरपंच भाऊसाहेब कोळेकर इत्यादी चा सत्कार करण्यात आले. याप्रसंगी नुकतीच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शरदभाऊ बाचकर यांचा सत्कार,सन्मान उपस्थितांनी केला.
यावेळी स्वप्नील लोखंडे आरपीआय आठवले गट,रासप जिल्हाउपाध्यक्ष शिवाजी खेडेकर,शिवाजी सरक तालुकाध्यक्ष राहुरी,बिलाल भाई शेख अल्पसंख्यांक आघाडी राहुरी, तालुका उपाध्यक्ष कपिल लाटे,नानासाहेब जगताप,अमोल तमनर,अभिमन्यू बाचकर,प्रभाजी शेंडगे कोंडीराम बाचकर,भारत हापसे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नारायणराव तमनर यांनी तर उपस्थित सर्वांचे आभार शरदराव बाचकर यांनी मानले