टाकळीभान टेलटँकचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेऊन लवकरच गेट बदलण्याच्या कामासाठी मंजुरी — ना.बच्चु कडू

टाकळीभान टेलटँकचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेऊन लवकरच गेट बदलण्याच्या कामासाठी मंजुरी — ना.बच्चु कडू
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील टाकळीभान टेल टॅंक साठी शासन निकषानुसार भंडारदरा धरणातून पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणेचा महत्वपूर्ण निर्णय झाला. तसेच टाकळीभान टेल टॅंक कमी कालावधीत भरणेसाठी टॅंकचे गेट बदलून नवीन गेटच्या इस्टिमेटला मंजुरी देऊन तात्काळ काम सुरू करणेचे आदेश देणेत आले जलसंपदा राज्यमंञी नामदार बच्चु कडू यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात राहुरी, श्रीरामपूर, व नेवासा तालुक्यातील विविध प्रश्नावर सुनावणी संपन्न.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश मंञी बच्चु कडू यांनी दिले आहे. प्रहारचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे व आप्पासाहेब ढुस यांनी शेतकऱ्यांच्या अडी अडाचनी मांडल्या असता मंञी महोदयांनी शेतकऱ्यांवर होनारे अन्याय सहन करणार नाही आसे म्हणात शेतकऱ्यांविषयीच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
मुंबई (मंत्रालय) – दि. १३ मे २२
प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांच्या मागणी नुसार जलसंधारण राज्यमंत्री मा. ना. श्री बच्चूभाऊ कडू यांचे दालनात व उपस्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व नेवासा, राहुरी तालुक्यातील विविध विषयांवर दुपारी १२.३० वा. बैठक संपन्न झाली.
या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे, प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे सह पाटबंधारे विभागाचे मुख्य सचिव, कक्ष अधिकारी, गोदावरी जायकवाडी महामंडळाचे चिफ इंजिनिअर जयंत गवळी (जलसंपदा विभाग), अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांचेसह अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते. .
तसेच देवळाली प्रवरा ता. राहुरी येथील प्रसादनगर भागात असलेल्या शिंगी प्लॉट मधील अनधिकृत झोपडपट्टी मध्ये नवीन अंगणवाडीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे संबंधितांना मंत्री महोदयांनी आदेश दिले.तसेच देवळाली प्रवरा ता. राहुरी हद्दीतील पाणी वापर संस्थांचे पुनर्विलोकन करणेसाठी तात्काळ माहिती सादर करण्याचे संबंधितांना या प्रसंगी ना. बच्चूभाऊ कडू यांनी आदेश दिले.
या बैठकीत नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा येथील जायकवाडी पाटबंधारे विभागाकडे जमीन संपादनासाठी प्रलंबित असलेल्या फाईल या शेतकरी प्रश्नावर माहिती सादर करण्यात हलगर्जीपणा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांची मंत्री महोदयांनी कान उघाडणी करून त्यांचेवर उच्चस्तरीय चौकशी करून कारवाईचे मुख्य सचिवांना आदेश दिले. व सुरेगावच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले.
गेल्या वर्षी कोरोना काळात ना. बच्चूभाऊ कडू यांनी टाकलीभान येथील प्रहार च्या अन्न छत्राला भेट दिली असता प्रहार चे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख यांनी टाकळीभान व परिसरातील गावकऱ्यांच्या वतीने भविष्यातील भंडारदरा धरणातील टेल टॅंक मध्ये कायम स्वरुपी आरक्षित हक्काचे मिळणेसाठी दिलेल्या शब्दाची आज वचन पूर्ती केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी ना. बच्चूभाऊ कडू यांचे आभार मानले.