माजी आमदार राहुल जगताप यांच्या बैलगाडा शर्यतीवर श्रीगोंदेकर फिदा..
श्रीगोंदेकर म्हणतात आता नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत...

माजी आमदार राहुल जगताप यांच्या बैलगाडा शर्यतीवर श्रीगोंदेकर फिदा…
श्रीगोंदेकर म्हणतात आता नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत…
श्रीगोंदा तालुक्यात पहिल्यांदाच पिंपळगाव पिसा येथे रेणुकामाता यात्रौत्सव व कर्मयोगी कुंडलीकराव जगताप यांच्या जयंतीनिमित्त निमित्त माजी आमदार राहुल जगताप यांनी पिंपळगाव पिसा येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते .या बैलगाडा शर्यतीत सुमारे 400 बैलगाडा प्रेमींनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये आंबेगाव, पारनेर, जुन्नर, खेड, मावळ,शिरूर, राहुरी, संगमनेर, श्रीगोंदा तालुक्याती बैलगाडा प्रेमींनी सहभाग घेतला.पहिल्या दिवशी घाटाचा राजा म्हणून पांडुरंग किसन काळे आणि दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा प्रतीक जालिंदर ढमढेरे यांची निवड झाली.
कोरोनानंतर पहिल्यांदाच श्रीगोंदा तालुक्यात बैलगाडा शर्यत झाल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात भर उन्हात हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. या बैलगाडा शर्यतीसाठी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार, पारनेर चे आमदार निलेश लंके, नगर चे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार,नगराध्यक्ष मनोहर पोटे, माजी सभापती भैय्या लगड,सचिन जगताप, शहाजी खेतमाळीस,संग्राम घोडके, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी राहुल जगताप यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीचे आणि त्यास इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळाल्याबद्दल कौतुक केले.पिंपळगाव पिसा येथील ही बैलगाडा शर्यत अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी शर्यत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
दोन दिवस चाललेल्या या बैलगाडा शर्यतीत पहिल्या दिवशी फायनल मानकरी म्हणून प्रथम क्रमांक पांडुरंग किसन काळे,द्वितीय क्रमांक- रुबाब कलेक्शन, पारनेर, तृतीय क्रमांक- भास्कर बापूराव कवाष्टे राजापूर, चतुर्थ क्रमांक – सचिन दिनकर खेडकर रांजणगाव दुसऱ्या दिवशी चे फायनल मानकरी प्रथम क्रमांक- प्रतिक जालिंदर ढमढेरे, द्वितीय- पप्पूशेठ रत्नाकर सरोदे, तृतीय क्रमांक-अमोल माणिक बांदल,चतुर्थ क्रमांक – शांताराम महादू काशीद यांनी बक्षीस मिळविले.तर मनपसंद गाडा म्हणून भास्कर बापू कवाष्टे राजापूर यांची निवड करण्यात आली.
ही बैलगाडा शर्यत यशस्वी करण्यासाठी राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे,यात्रा उत्सव समिती, आर जे ग्रुप, व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
कोरोनानंतर पहिल्यांदा पिंपळगाव पिसा मध्ये ही बैलगाडा शर्यत आयोजित केली. त्यास जनतेने अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला.भविष्यात सुशिक्षित बेरोजगार युवक व युवकांसाठी व्यवसाय शिबिर आणि नोकरी मेळावा आयोजित करणार आहे.