संपादकीय
तिळापुर येथील जय भवानी मातेची यात्रा मोठ्या जल्लोषात होणार साजरी.

तिळापुर येथील जय भवानी मातेची यात्रा मोठ्या जल्लोषात होणार साजरी.
राहुरी तालुक्यातील तिळापूर येथील मुळा माईचा काठावर असलेल्या जय भवानी मातेची यात्रा दोन वर्ष कोरोना काळात बंद ठेवण्यात आली होती. परंतु कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने तिळापुर ग्रामस्थांनी खास करून तरुण पिढीने पुढाकार घेऊन चालू वर्षी मोठ्या जल्लोषात यात्रा साजरी करण्याचा चंग बांधला. जय भवानी मातेच्या कृपा आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून भाविक येत असतात भवानी मातेच्या यात्रेसाठी आज कावड आणण्यासाठी गावातील तरुण गंगे कडे रवाना झाले आहेत. उद्या सकाळी म्हणजे दिनांक दहा 10/5/2022 रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत कावड मिरवणुक होणार त्यानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनाचा व जत्रेचा लाभ घ्यावा व रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत छबिना मिरवण्याचा कार्यक्रम होणार आहे. याचाही नागरिकांनी आनंद व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तिळापूर ग्रामस्थांनी केली आहे.