संक्रापुर विविधा कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी महेबुब शेख तर व्हा .चेअरमन पदी सौ योगीता चव्हाण

संक्रापुर विविधा कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी महेबुब शेख तर व्हा .चेअरमन पदी सौ योगीता चव्हाण
–संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते महेबुब ईमाम शेख यांची तर व्हा चेअरमन पदी सौ योगीता यमासाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक संपन्न होवुन संक्रेश्वर जनसेवा शेतकरी विकासा अघाडीला अकरा जागा मिळाल्या होत्या तर विरोधी संक्रेश्वर जनसेवा मंडळाला दोनच जागा मिळाल्या होत्या निवडणूक निर्णय अधिकारी आर पी आगरकर यांनी चेअरमन व व्हा चेअरमन निवडीकरीता बैठक बोलविली होती त्यात चेअरमन पदाकरीता एकमेव महेबुब ईमाम शेख यांचा अर्ज आला त्यांच्या नावाची सूचना बाबासाहेब जगताप यांनी मंडली तर भर्तरीनाथ सालबंदे यांनी त्यास अनुमोदन दिले व्हा चेअरमन पदाकरीता सौ योगीता यमासाहेब चव्हाण यांच्या नावाची सूचना राजु जगताप यांनी मांडली त्यास शशिकांत भोंगळे यांनी अनुमोदन दिले दोन्ही पदाकरीता एकेकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर पी आगरकर यांनी चेअरमन पदी महेबुब शेख तर व्हा चेअरमन पदी सौ योगीता चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव गीताराम काळे प्रकाश नलगे यांनी काम पाहीले या वेळी नुतन चेअरमन महेबुब शेख व्हा चेअरमन सौ योगीता चव्हाण संचालक बाबा.साहेब जगताप भर्तरीनाथ सालबंदे त्रींबक जगताप राजेंद्र जगताप सौ. सिताबाई खेमनर ज्ञानदेव होन बाळासाहेब चोखर पत्रकार देविदास देसाई शशिकांत भोंगळे पंढरीनाथ जगताप जालींदर चव्हाण आदि संचालक उपस्थित होते निवडीनंतर संक्रेश्वर मंदीरात दर्शन घेवुन चेअरमन व्हा चेअरमन व सर्व संचालकांना रथात बसवुन फटाक्याच्या अतिषबाजीत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली सोसायटी स्थापनेपासून आजपर्यंत निघालेली ही पहीली अभूतपूर्व मिरवणूक होती अनेक जण गट तट विसरुन या मिरवणूकीत सहभागी झाले होते .या वेळी माजी चेअरमन नबाजी जगताप माजी सरपंच संजय जगताप कल्याणराव जगताप अन्सार शेख कादर शेख मिलींद बोरावके रोहीदास खपके बाळासाहेब हरिश्चंद्रे भास्कर महाराज पागीरे सुभाष दाते चंद्रभान जगताप रज्जाक शेख पिरन शेख द्वारकनाथ चव्हाण प्रकाश बोरावके राजु बोरावाके प्रभाकर चव्हाण कादर शेख मिलींद बोरावके जावेद सय्यद गोकुळ सालबंदे दादासाहेब जगताप बाजीराव जगताप आनदा बर्डे संभाजी जाधव आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शेवटी रामराव होन यांनी आभार मानले राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ जायभाय व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.