गाव व वाड्या वस्त्यावर वेगवेगळ्या विकासाच्या योजना राबविणार -जि प सदस्य शरद नवले

गाव व वाड्या वस्त्यावर वेगवेगळ्या विकासाच्या योजना राबविणार –जि. प. सदस्य शरद नवले
एका वर्षात गांवकरी मंडळाने स्वच्छ व पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामपंचायतीच्या शताब्दी वर्षानिमित्त गाव व वाड्या वस्त्यावर वेगवेगळ्या योजना राबविणार असुन गावाचा चेहरा मोहरा बदलवणार असल्याची ग्वाही गांवकरी मंडळाचे नेते जि प सदस्य शरद नवले यांनी दिली गांवकरी मंडळाने एक वर्षाचा कार्यकाल पुर्ण केल्याबद्दल केलेल्या कामाचे मूल्यमापन त्या बाबत कार्यकर्त्यांच्या सूचना तसेच सोसायटी निवडणूकितील पराभवाचे विचारमंथन या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी नवले वस्तीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालींदर कुऱ्हे होते. जि प सदस्य शरद नवले पुढे म्हणाले,की गावाचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवुन गांवकरी मंडळाचा उदय झाला विरोधकांच्या अनेक वावड्या उठत असतानाही बेलापुर ग्रामपंचायतीत मंडळाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कारभार केला आहे. कोरोना काळात ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच विनामूल्य कोवीड सेंटर सुरु करुन अनेक रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचे काम करता आले .गांवकरी मंडळावर नेत्याचा पूर्णपणे अंकुश असुन कुठल्याही चुकांची पुनरावृत्ती होवू देणार नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नाही तसेच ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठीही प्रयत्न केले गेले नाही. गावाला फील्टर पाणी देण्याचा आमचा मानस आहे तसेच तरुणांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन देण्याकरीता व अभ्यास करण्याकरीता स्वतंत्र इमारत उभारणार आहे.बेलापुर हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आधार गृपच्या माध्यमातून सामूहीक गट शेती करावयाची योजना असुन या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्य हाती घेणार असल्याचे नवले म्हणाले.या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की गांवकरी मंडळाच्या विजयानंतर गावात एकही फ्लेक्स बोर्ड लावला नाही.दररोज एका नागरीकांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची नवी परंपरा सुरु केली. महानुभाव आश्रमाजवळीला रस्ता खूला केला,खटोड काँलनीतील गटारीचा रेंगाळलेला प्रश्न सोडवीला.राजकारणा पलीकडे जावुन गावाचा विकास करण्याचा आमचा मनोदय आहे बेलापुर सोसायटीत झालेला पराभव हा तांत्रीक कारणामुळे झालेला पराभव आहे आमचे सर्व सदस्य प्रामाणिकपणे काम करत असुन विरोधकांना देखील आरोप करण्याची संधी आम्ही दिली नसल्याचे खंडागळे म्हणाले. या वेळी सरपंच महेंद्र साळवी गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे, सुनिल मुथा,रणजित श्रीगोड, देविदास देसाई विलास कुऱ्हे प्रमोद अमोलीक बाळासाहेब वाबळे, बाळासाहेब दाणी,लहानु नागले तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे भाजपा सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,बाळासाहेब दाणी,विलास कु-हे,मोहसीन सय्यद,प्रमोद अमोलिक,अकबर सय्यद, लहानु नागले,आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कनजीशेठ टाक, भाऊसाहेब कुताळ,प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,यादव काळे,ग्रामपंचायत सदस्य तबसुम बागवान,मीना साळवी,उज्वला कुताळ,प्रियंका कु-हे,स्वाती अमोलिक,चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,रमेश काळे,शांतीलाल हिरण,प्रविण बाठीया,संजय बाठीया,पत्रकार दिलीप दायमा,किशोर कदम,वृद्धेश्वर कु-हे,रामदास वाबळे,गोरक्षनाथ कु-हे,मधुकर अनाप,सुरेश बोंबले,शाम मेहेत्रे,शशिकांत नवले,प्रकाश मेहेत्रे,प्रभाकर खंडागळे,अनिल कु-हे,संजय गोरे,सारंगधर खंडागळे,राकेश कुंभकर्ण, प्रशांत मुंडलिक,नितीन शर्मा,गोरख कुताळ,चंद्रकांत लबडे,प्रभात कु-हे,टिंकू राकेचा,लक्ष्मण राशिनकर,शहानवाज सय्यद,अशोक लबडे, सचिन वाघ,शफीक बागवान,दादासाहेब कु-हे,रवींद्र कुताळ,राजेंद्र कुताळ,अजीज शेख, श्रीहरी बारहाते,अल्ताफ शेख,बापू कु-हे,दादासाहेब कुताळ,रावसाहेब अमोलिक,शरद अंबादास नवले,राजेंद्र काळे,मास्टर हुडे,गोपी दाणी,भाऊसाहेब राक्षे,कुंदन कुताळ, अजय शेलार, बाळासाहेब शेलार,विजय हुडे,समीर जहागिरदार,नंदू शेलार,प्रभाकर ताके,जब्बार आतार,प्रतीक मुथ्था,रफिक शेख,रावसाहेब कु-हे,अक्षय दहिवाळ,नवाब सय्यद, रमेश लगे,सचिन हरदास,भिकाजी मेहेत्रे,समद सय्यद,जय संचेती,मंगेश नजन,विजय पोपळघट,अन्वर सय्यद,रमेश कुमावत,राम सोनवणे, विशाल आंबेकर,संदिप जाधव, अमोल गाडे,महेश कु-हे,सचिन जाधव,अक्षय गाढे,ऋषीकेश नवले,हरिष शेजुळ,सुभाष राशिनकर,दिपक पोपळघट,गणेश फुलभाटी,भाऊ नागले,नितीन पोपळघट,अनिस शेख,जयेश अमोलिक,आदी उपस्थित होते.