क्रिडा व मनोरंजन

१२०० किमी सायकलिंग फक्त ८० तासात.

१२०० किमी सायकलिंग फक्त ८० तासात

 

 

 

 

सोनंई अहमदनगरचे सायकलपटू शरद काळे पाटील यांनी तमाम सायकलपटूंसाठी प्रेरणादायी अशी कामगिरी करत एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे.
पुणे रांडनेऊर्स ने आयोजित केलेल्या बाराशे किलोमीटर सायकलिंग मध्ये भाग घेऊन ती वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण केली.

 

पुणे रांडनेऊर्स ने आयोजित केलेल्या १२०० किमी सायकलिंग मध्ये काळे पाटील यांनी सहभाग घेतला होता. २४ मार्च ला दुपारी ४ वाजता याची सुरवात चांदणी चौक पुणे येथून झाली. पुणे पनवेल पुणे सातारा कराड कोल्हापूर निपाणी बेळगांव हुबळी धारवाड हावेरी व परत पुणे असे एकूण १२०० किमी अंतर सायकलिस्ट यांना ९० तासात पूर्ण करायचे होते. हे अंतर काळे पाटील यांनी फक्त ७९ तास ३७ मिनिटात पूर्ण केले. ह्याची सांगता चांदणी चौक येथेच झाली.

 

ह्या स्पर्धेत एकूण ११ स्पर्धक सहभागी झाले होते. त्या पैकी फक्त ६ जणच ही स्पर्धा वेळेत पूर्ण करू शकले. तीन दिवस व तीन रात्र सायकल चालवणे ही साधी व सोपी गोष्ट नाही. ते ह्या स्पर्धकांनी सिध्द करून दाखवले. दोन सायकलिस्ट यांना सायकल च्या तांत्रिक अडचणीमुळे स्पर्धा सोडावी लागली त्या मध्ये अहमदनगरचे श्री जस्मित वाधवा यांचा समावेश आहे. श्री अमर संकपाल यांचा हुबळी येथे अपघात झाला. अपघात झाल्यानंतर काळे पाटील यांनी तत्काळ हुबळी हाय वे ट्रॅफिकशी संपर्क साधून तत्काळ पोलिस व रुग्णवाहिकेची मदत मिळवली.
अहमदनगरच्या या कुशल सायकल स्वाराणे एकाच वर्षात तीन वेळा सुपर रैंडोंनीअयर्स होण्याचा मान मिळविला आहे तर आज पर्यंत ते सहा वेळा सुपर रांडन्युर झाले आहेत.
स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जाणे हा बीआरऐमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ही शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीचा कस वाढवणारी स्पर्धा आहे..
काळे पाटील हे उत्कृष्ट मोटार सायकलपटू देखील आहेत. अनेक विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहेत. संपूर्ण अष्टाविनायक यात्रा मोटार सायकलवर त्यांनी 12 तास 12 मिनिटात पूर्ण केली. त्यामुळे त्यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे. तसेच भारताचा सुवर्ण चतुष्कोन मुंबई – दिल्ली- कलकत्ता- मद्रास व परत मुंबई असे एकूण ५८४७ किमी अंतर त्यांनी मोटारसायकल वर फक्त ८८ तासात पूर्ण केले आहे. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

काळे पाटील यांनी सायकलिंग क्षेत्रात सुद्धा भरारी घेतली आहे. ते उत्कृष्ट मोटार सायकलपटू तर आहेतच. ते अल्ट्रा मॅरेथॉन पटू देखील आहेत.

 

 

आज पर्यंत सहा वेळा सुपर रांडन्युर तसेच १००० व १२०० किमी अंतर ठराविक वेळेत पूर्ण करणाऱ्या काळे पाटील यांच्यावर सायकल प्रेमी कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऑगस्ट मध्ये लंडन येथे होणाऱ्या लंडन ईडनबर्ग लंडन या सायकल स्पर्धेमध्ये ते भाग घेत आहेत. तसेच पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या रेस आक्रॉस अमेरिका व पॅरिस ब्रेस्ट पॅरिस या स्पर्धेसाठी ही पात्र झाले आहेत. अहमदनगरच्या या उगवत्या ताऱ्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
05:29