महाराष्ट्र

श्रीरामपूर नेवासा राजमार्ग टाकळीभान गावात डिव्हायडरमध्ये गॅप सोडून गतिरोधक बसवावे.प्रहार जनशक्ती जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख यांची मागणी.

श्रीरामपूर नेवासा राजमार्ग टाकळीभान गावात डिव्हायडरमध्ये गॅप सोडून गतिरोधक बसवावे.प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख यांची मागणी.
              सध्या श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.या रस्त्याच्या कामादरम्यान रस्त्याची रुंदीही वाढविण्यात येत आहे.याच कामामध्ये टाकळीभान गावात श्रीरामपूर व नेवासा मार्गे प्रवेश करताना डिव्हायडर उभारण्याचे काम सुरु आहे.तरी हे डिव्हायडर अखंड व सलग उभारण्यात येत असून त्यामध्ये जाण्या येण्यासाठी नागरिकांना थोडीही जागा सोडली जात नाही.तरी सदर डिव्हायडरमध्ये प्रत्येकी ५० फुटांवर नागरिकांना येण्याजाण्यासाठी मोकळी जागा सोडावी व गावात प्रवेश करतेवेळी गतिरोधक बसविण्याची मागणी  प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नवाज शेख यांनी म्हटले आहे की,सध्या श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गाचे मजबुतीकरण,डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.याच कामामध्ये टाकळीभान गावात श्रीरामपूर व नेवासा मार्गे प्रवेश करताना डिव्हायडर उभारण्याचे काम सुरु आहे.वास्तविक डिव्हायडर लावताना श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गाला जे जोडरस्ते येऊन मिळतात त्याठिकाणी मोकळी जागा सोडणे अपेक्षित होते.मात्र दोन्ही बाजूने डिव्हायडर उभारताना केवळ मध्यभागी मुख्य चौकातच प्रचंड मोठा गॅप सोडलेला आहे.याच श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गाला गुजरवाडीवरुन येणारा जोडरस्ता येतो.त्या रस्त्यावरुन प्रचंड वर्दळ असते.तसेच त्याच रस्त्याच्या समोरुन ( विरुद्ध बाजूने ) सरकारी दवाखान्याच्या पुर्वेकडून गावातील मुख्य पेठेत,बँकेत,शाळेत जाण्यासाठी रस्ता आहे.श्रीरामपूर नेवासा रस्त्याच्या दक्षिणेकडील जास्तीत जास्त नागरिक या रस्त्याचा पर्यायी व सुरक्षित रस्ता म्हणून वापर करतात.मात्र अखंड डिव्हायडरमुळे या रस्त्याचा वापर होण्याऐवजी गावातील मुख्य चौकातील रस्त्याचा वापर होऊन मुख्य चौकातच जास्त गर्दी होणार आहे पर्यायाने मुख्य चौकात अपघाताचे प्रमाण वाढू शकते.
तसेच अखंड डिव्हायडरमुळे गावातील व्यापार धंद्यावर देखील प्रतिकुल परिणाम होणार आहे.
तरी वरील वस्तुस्थिती लक्षात घेता  टाकळीभान गावातील डिव्हायडर अखंड ठेवण्याऐवजी प्रत्येकी ५० फुटांवर गॅप ठेवावा.
तसेच डिव्हायडर उभारताना सरकारी दवाखान्यालगतच्या पर्यायी रस्त्यासमोर चारचाकी वाहन जाईल एवढा गॅप ठेवावा.जेणेकरुन गावातील मुख्य चौकात गर्दी होणार नाही.
टाकळीभान गावात प्रवेश करताना दोन्ही बाजूने गतिरोधक बसवावे व त्यावर पांढर्‍या रंगाचे पट्टे मारावे.तसेच उभारण्यात येणारे डिव्हायडदेखील पिवळ्या व काळ्या आॅईल पेंट रंगाने रंगविण्यात यावे.
अशा विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
 नेवासा तालुक्याचे शहर आहे मात्र तेथे डिव्हायडर नाही.श्रीरामपूर शहरातील डिव्हायडरला ठिकठिकाणी ये जा करण्यासाठी मोकळी जागा ठेवलेली आहे.या शहरांच्या तुलनेत टाकळीभानची बाजारपेठ छोटी आहे तरी या डिव्हायडमुळे व्यापार धंद्यावर मोठा प्रतिकुल परिणाम होणार आहे.
Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे