श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची पुण्यतिथी साजरी.

टाकळीभान येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची पुण्यतिथी साजरी.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात किसनगिरी बाबा भक्त मंडळाच्या वतीने समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सौ. कमल पटारे व बाळासाहेब पटारे यांच्या हस्ते समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांच्या मूर्तीस गंगाजलाने स्नान, अभिषेक, विधीवत पूजा व आरती करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य संजय देवळालकर गुरू यांनी केले. आरती नंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय नाईक, राहूल पटारे, भाऊ कोकणे, दादासाहेब पटारे, शिवाजी वखरे, अनिल मगर, विक्रम मगर, सुभाष ब्राम्हणे, एकनाथ पटारे, अशोक पवार, शिवाजी पटारे, भाऊसाहेब कोकणे, रोहिदास पटारे, गोकुळ भालेराव, भानुदास नवले, राजेंद्र कोबरने, नाना नवले आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथे समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित किसनगिरी बाबा भक्त मंडळ व ग्रामस्थ.