खुपच आनंदाचा दिवस* *माझी मुलगी कलेक्टर झाली*

*खुपच आनंदाचा दिवस*
*माझी मुलगी कलेक्टर झाली*
मला तुम्हा सर्वाना माझी मुलगी डाॅ. पुजा दिदी UPSC ची अंतीम परीक्षा पास झाल्याची आंनदाची बातमी देण्याअगोदर ती सर्वानी माहीती झाली आणि आम्हालाच अभिनंदनाचे फोन काॅल आले.
खरोखरच आमच्या कुटुंबीयाच्या दृष्टीने आजचा दिवस खुप शुभ आणि आनंदाचा आहे. गेल्या अनेक वर्षापासून दिदीने कशाचीही तमा न बाळगता जे कष्ट घेतले त्याचे हे फलित आहे. माझे वडील दिदीचे अजोबा जगन्नाथराव बुधवंत (IAS) यांची दिदीने IAS व्हावे अशी मनापासून इच्छा होती. त्यांचे हे स्वप्न आज साकार झाले. खर तर तिचे हे यश पाहण्यासाठी आपल्यात ते असायला हवे होते. ते असते तर त्यांना खुपच आनंद झाला असता.
दिदीच्या वडीलाची पण सातत्याने इच्छा होती की त्यांच्या नंतर घरातील कोणीतरी प्रशासनातील उच्च पदावर विराजमान व्हावे आणि त्याचा कुटुंबासोबतच माझ्या गावाला, माझ्या भागाला उपयोग व्हावा. माझी आई म्हणून सातत्याने इच्छा आणि प्रयत्न होते की माझ्या मुलीला दिदीला मुला एवढेच स्वतंत्र आणि सर्व क्षेञात समान संधी मिळाली पाहिजे . या विचारानेच मी समाजाची कोणतीही तमा न बाळगता तिला UPSC ची परीक्षा देण्यासाठी दिल्लीला पाठवले. बंधु पियुष भैय्याने वयाने लहान असुनही या परीक्षेचा अभ्यासात सातत्य ठेवण्यासाठी सारखा दिदीला पाठींबा दिला. तिचे काका माणिकमामाना सारखे तहसीलदार, प्रांत यांच्याकडे जाऊन गावच्या कामासाठी विनंत्या कराव्या लागत म्हणून त्यांना वाटायचे दिदीने यांचे वरचे पद घ्यावे, कलेक्टर बनावे आणि या लोकांच्या मी नाही तर त्यांनी माझ्या पुढे पुढे करावे. यासाठी त्यांनी दिदीला जी पाहीजे ती मदत केली. दिदीची आजी अजोबा, आत्या , मोठे चुलते केशव काका , सर्व चुलत्या, भाऊ ,बहीणी आणि सर्व नातेवाईकाच्या अशिर्वाद आणि शुभेच्छामुळे दिदी UPSC पास झाली.
संपूर्ण देशात UPSC परीक्षेत तिचा 679 क्रमांक आला असुन मुलींमधे 25 वा क्रमांक आहे. आपल्या सर्वाच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे तिला IAS केडर मिळुन महाराष्ट्रात तिचे पोस्टिग होणार आहे.