प्राईड अँकेडमी ग्रामीण भागातील ज्ञानमंदिर -प्रा.निर्मळ

प्राईड अँकेडमी ग्रामीण भागातील ज्ञानमंदिर -प्रा.निर्मळ
टाकळीभान प्रतिनिधी :श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी सोबत संस्कृत शिक्षण उपलब्ध करून देणारी प्राईड अँकेडमी कौतुकास पात्र आहे. डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे भविष्यामध्ये निश्चितच वटवृक्षात रूपांतर होवो अशा शुभकामना प्रा.निर्मळ यांनी व्यक्त केल्या. माऊली प्रतिष्ठान श्रीरामपूर संचलित टाकळीभान येथील प्राईड अँकेडमी स्कूलच्या आजी- आजोबा मेळाव्या प्रसंगी प्रा. निर्मळ बोलत होते. माजी सभापती नानासाहेब पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उत्तमराव पवार, दिलीप कोकणे, बाबा पोखरकर ;रामकृष्ण गायकवाड आदी ज्येष्ठांच्या उपस्थितीमध्ये आजी आजोबा मेळाव्याचा शुभारंभ झाला.माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे,श्रीरामपूर पंचायत समितीच्या मा. सभापती व प्राईड अकॅडमीच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे, सुनंदाताई निर्मळ, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, बंडोपंत बोडखे, सुदामराव पटारे, प्रकाश जाधव ,प्रभाकर जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रा. निर्मळ म्हणाले की भेर्डापूर वांगी तसेच टाकळीभान या ग्रामीण भागात ज्ञानदानाचे काम करणे अवघड काम आहे, डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी जीव ओतून हा ज्ञानयज्ञ यशस्वी उभा केला आहे. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले की या भागाकडे मुरकुटे यांच्या प्राईड अकॅडमी ने हा मेळावा पहिल्यांदाच आयोजित करून नव्या पिढीला सुसंस्कारित शिक्षणाचा संदेश दिला आहे, तसेच त्यांनी प्राईडच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात पाहुण्यांना परिचय करून देत इंग्रजी व संस्कृत मध्ये केलेल्या भाषणाचे कौतुक केले. यावेळी. दिलीप कोकणे, खंडेराव गवांदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमावेळी आजी आजोबांनी आपल्या नातवांसमवेत खेळण्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमास डॉ. विवेक तुपे,अंबादास सलालकर, अण्णासाहेब दाभाडे, दिलीप पटारे, दादाभाऊ तोडमल,रावसाहेब शेरकर, दादासाहेब काळे, अप्पासाहेब वाघुले, भैय्या पठाण, रावसाहेब वाघुले,, प्रा. बाळासाहेब पटारे, बापू शिंदे,रामनाथ माळवदे आदींसह प्राईड अकॅडमी स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक वृंद व त्यांचे आजी-आजोबा,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या प्रीती गोटे, सूत्रसंचालन आदिती जंगम यांनी तर आभार पवन घोगरे यांनी मानले.