क्रिडा व मनोरंजन
स्टार खेळाडू अस्लम याचे टाकळीभान येथे जंगी स्वागत.

स्टार खेळाडू अस्लम याचे टाकळीभान येथे जंगी स्वागत.
प्रो कबड्डी लीग २०२२ मध्ये गावाचे नाव उंचवणारा खेळाडू अस्लम इनामदार याचा टाकळीभान येथी नूकताच कान्हा खंडागळे मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्याची प्रो कबड्डी सिजन ८ साठी निवड झाली होती. पुणेरी पलटन या संघाकडून खेळत असताने १६९ चढाई अंकासोबतच २० पकडी करत त्याने उत्कृष्ठ खेळ दाखविला.
प्रो कबड्डी सिजन ८ संपल्यानंतर प्रथमच त्याचे शुक्रवार ता.४ रोजी आपल्या जन्मगावी टाकळीभान येथे आगमन झाले. अस्लम येणार असल्याची माहीती मिळताच येथील उपसरपंच कान्हा खंडागळे व टाकळीभान ग्रामस्थ त्याच्या स्वागताच्या तयारीला लागले. सायं.६ वाजेच्या दरम्यान अस्लम याचे ढोलताश्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतीषबाजीत उपस्थित ग्रामस्थांनी त्याचे जल्लोशात स्वागत केले. यावेळी आपल्या खेळाडूच्या स्वागातासाठी मोठ्या प्रमाणात जनसमूदाय उपस्थित होता.
मिरवणूक पार पडल्यानंतर येथील ग्रामपंचायती समोर अस्लम इनामदार याचा सहपरिवार यथोचित भव्य असा नागरी सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच मंजाबापू थोरात, उपसरपंच कान्हा खंडागळे मौलाना भाईसाब मामू शेख, तालुका काॅग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष दादासाहेब कोकणे, मेजर अल्ताफ शेख, आबासाहेब रणनवरे, नवाज शेख, अॅड.सर्जेराव कापसे, विष्णूपंत खंडागळे, महेंद्र संत, मोहन रणनवरे, भाऊसाहेब पटारे, गणेश कोकणे, जयकर मगर सर
अॅड.दिपक कोकणे, विलास सपकळ, लक्ष्मण कदम, भैय्या पठाण, किरण धुमाळ, अनिल पटारे, राहुल कोकणे भारत भवर आदीसह अस्लमची आई जाकीरा मुस्तफा इनामदार, भाऊ वसीम इनामदार, मेहराज इनामदार, फैय्याज इनामदार, सिराज इनामदार, भाईसाहेब आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.