सावता माळी युवक संघातर्फे आरोग्य शिबिर*

*सावता माळी युवक संघातर्फे आरोग्य शिबिर*
वांबोरी येथील माळीगल्ली गणपती मंदिरात घेण्यात आलेल्या मोफत बॉडी चेकअप व आहार मार्गदर्शन शिबिरास परिसरातील नागरीकांचा उत्तम प्रातिसाद मिळाला. शिबिराचे आयोजन श्री संत सावता माळी युवक संघातर्फे करण्यात आले होते. या शिबिरात जापनीज टेक्नॉलॉजी मशीन द्वारे बॉडी ॲनालिसिस (शरीराची सध्याची स्थिती) बी.एम. आय नुसार योग्य खाण्यापिण्याचा सल्ला, स्नायूची स्थिती,शरीरावरील फॅट, त्वचेचे आरोग्य, वजन कमी करणे व वजन वाढविणे, उंचीनुसार वजन कमी करणे व वजन वाढवणे, उंचीनुसार वजन किती असायला पाहिजे. वाढलेल्या वजनामुळे शरीरात होणारे आजार व त्यावरील उपाय या सर्व विषयांवर आरोग्य सल्लागार निखिल कानडे, आरोग्य सल्लागार सुनील रांधवणे, आरोग्य सल्लागार सतीश ससाने, अनिल राजळे, शिदोरे अशोक , तसेच संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव तुपे आदींनी मार्गदर्शन केले.
या शिबिराचे आयोजन श्री संत सावता माळी युवक संघाचे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख दिपक साखरे, वांबोरी शहराध्यक्ष सुनील शिंदे, महिला आघाडीच्या जयश्रीताई व्यवहारे यांनी यासाठी प्रयत्न केले. या शिबिरास मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदवला व शिबिराचा लाभ घेतला.