अदिवासी व दुर्गम भागात शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना एक नवी दिशा दिली/फादर

अदिवासी व दुर्गम भागात शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना एक नवी दिशा दिली/फादर थॉमस
वावरत जांभळी, जांभूळबंन आदिवासी व दुर्गम भागात, फादर थॉमस यांनी २००० साली, शाळा सुरू करून येथील आदिवासी व अनुसूचित जाती व भटक्या समाजातील मुलींना व मुलांना शिक्षणाच्गया प्रवाहात आणून त्यांना एक नवी दिशा देऊन त्यांचा सर्वांगीण विकास केला,या यशस्वी प्रयत्नानंतर त्यांनी या परिसरातील मुली व महिलांना प्रवाहात आणून त्यांना स्वालंबी बनवण्यासाठी व त्या त्या मुली व महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत ही करू शकतील यासाठी वावरत येथे डी पॉल टेलरिंग सेंटर सुरू करण्यात आले, त्याचे उद्घाटन सिस्टर लिटिल फ्लावर सी एम सी प्रोविन्शियल सुपिरियर एरणाकुलमे विमला,तसेच राहुरी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी अण्णासाहेब सोडणार, फादर सजी ,सी आण तेरोसा,सी पवित्रा मिशन सुपीरियर अ,नगर, फादर फिलीप, सिस्टर विक्टोरिया, डि पॉल शाळेचे मुख्याध्यापक कुटे सर वावरत सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, जांभळी सरपंच रामदास, उपसरपंच रावसाहेब केदार, वावरत सो,सा,चेअरमन अप्पासाहेब बाचकर, तसेच मोठ्या प्रमाणावर मुली व महिला उपस्थित होत्या या सर्व कार्यासाठी वावरत, जांभळी व जांभूळबंन येथील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ फादर थॉमस यांना व डी पॉल स्कूल वावरत यांना कायम सहकार्य करून त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभाग नोंदवतात या सर्व कार्याबद्दल वावरत सरपंच ज्ञानेश्वर बाचकर यांनी फादर थॉमस वडी पॉल स्कूल (हायस्कूल) यांचे विशेष आभार मानले.