धार्मिक

श्रीक्षेत्र शिलेगाव येथे सप्ताह कमेटी, ग्रामस्थ व पंचक्रोषीच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. 

श्रीक्षेत्र शिलेगाव येथे सप्ताह कमेटी, ग्रामस्थ व पंचक्रोषीच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. 

 

 

श्रीक्षेत्र तारकेश्‍वरगड येथील संत नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने व गुरूदेव महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली 45 वा नारळी सप्ताहाच्या आयोजनाची राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र शिलेगाव येथे सप्ताह कमेटी, ग्रामस्थ व पंचक्रोषीच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. 

22 ते 29 मार्च पर्यंत चालणार्‍या या भव्य सप्ताहासाठी जवळपास 20 एकर क्षेत्रात सुमारे 60 हजार चौरस फुट जंगी मंडप उभारणीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे सप्ताहासाठी येणार्‍या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून हा सप्ताहाचा एक विक्रम करण्यासाठी पंचक्राशीतील ग्रामस्थांनी व भाविकांनी कंबर कसली आहे.

सप्ताह कालावधीत सकाळच्या सत्रात 10 ते 12 दरम्यान किर्तनसेवा, दुपारी 3 वाजे नंतर प्रवचने, रात्री 8 वाजता किर्तनसेवा अशी दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा आहे. किर्तनसेवेत 22 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 महाराजांचे स्वागत समारंभ, दुपारी 3 वाजता आदिनाथ महाराज हारदे, गोकूळदास महाराज म्हसे, भगवान महाराज मोरे यांची प्रवचने तर रात्री 8 वाजता आसाराम महाराज बडे यांचे किर्तन, 23 रोजी कैलासगिरी महाराज यांचे किर्तन, दुपारी 3 वाजता कृष्णा महाराज पेरणे, संभुगिरी महाराज गोसावी, मच्छिंद्र महाराज चोरमले यांची प्रवचने तर रात्री 8 वाजता डॉ. जयंवत महाराज बोधले यांची किर्तन सेवा, 24 मार्च रोजी सकाळी उद्धव महाराज मंडलिक यांचे किर्तन, दुपारी 3 वाजता संजय महाराज शेटे, विजय महाराज तनपुरे, मच्छिंद्र महाराज ढोकणे यांची प्रवचने तर रात्री 8 वाजता पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचे किर्तन, शनिवार 25 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ज्ञानेश्‍वर महाराज कदम (आाळंदी) यांचे कीर्तन, दुपारी 3 वाजता सोमनाथ महाराज माने, नामदेव महाराज शास्त्री, आदिनाथ महाराज दुशिंग, यांची प्रवचने, तर रात्री 8 वाजता निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन, 26 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. विकासनंद महाराज मिसाळ यांचे किर्तन, दुपारी 3 वाजता चंद्रशेखर महाराज शास्त्री, कृष्णा महाराज जिरेकर, संजय महाराज म्हसे यांची प्रवचने, रात्री 8 वाजता अमृत महाराज जोशी (बीड) यांचे किर्तन, 27 मार्च रोजी सकाळी 10 वाजता रामराव महाराज ढोक यांचे किर्तन, दुपारी सुदर्शन महाराज शास्त्री, बाळकृष्ण महाराज कांबळे, मनोहर महाराज सिनारे यांची प्रवचने, रात्री उल्हास महाराज सुर्यवंशी यांचे किर्तन, 28 मार्च रोजी सकाळी 10 वाजता रामभाऊ महाराज राऊतयांचे किर्तन, दुपारी 3 वाजता बाबा महाराज मोरे, विजय महाराज कुहिले, सुनील महाराज पारे यांची प्रवचने, रात्री 10 वाजता उमेश महाराज दशरथे यांची किर्तन सेवा होणार आहे.

29 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 दरम्यान आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या महाप्रसादाने सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे. सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र शिलेगाव पंचक्रोषीतील ग्रामस्थांनी केले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे