महाराष्ट्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, टाकळीभान वतीने विजया दशमी निमित्त संघाचे पथसंचलन

श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे दि ६ /१०/२०२२ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, टाकळीभान वतीने विजया दशमी निमित्त संघाचे पथसंचलन करण्यात आले.
या संचलनासाठी टाकळीभान करांनी उत्पूर्त प्रतिसाद दिला.यावेळी फुलांचा वर्षाव करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ग्रामस्थांनी घरापुढे सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. संचलनाच्या ठिकाणी सडा, रांगोळी काढून संचलनाचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसन्न असा अदभुत नजरा टाकळीभान करांनी अनुभवाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून श्री. क्षेत्र बहिरमभट्ट देवस्थान घोगरगावचे बालसन्यासी महंत विश्वनाथगिरी महाराज तर प्रमुखवक्ते म्हणून सह संघचालक उत्तर नगर किशोर निर्मळ उपस्थित होते.
या संचालनासाठी टाकळीभान मधील सर्व स्वयंसेवाकांनी परिश्रम घेतले.
टाकळीभान— येथे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले.