सुख, शांती व समाधान हे केवळ ईश्वरी साधनेतच -गुरु केशव दिमोटे.

सुख, शांती व समाधान हे केवळ ईश्वरी साधनेतच -गुरु केशव दिमोटे.
बेलापुर (प्रतिनिधी )-जिवन जगण्याकरीता आवश्यक असणारे सुख समाधान व शांती हे केवळ ईश्वरी साधनेतच आहे त्यामुळे भक्तीभावाने परमेश्वराची पुजा करा व सुखी व्हा असा उपदेश रेणुका देविभक्त गुरु केशव दिमोटे यांनी दिला बेलापुर येथील जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या निवासस्थानी श्रावणमास निमित्त ओम् नमोशिवाय मंत्रोच्चाराचा जप तसेच पंचकुंडात्मक रुद्र याग व महाप्रसाद सोहळा संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त भजन किर्तन प्रवचन होम हवन आदि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी सत्संग सोहळ्यास येणाऱ्या भाविकास चहापाणी व खिचडी प्रसाद सेवा प्रदिप नवले महेंद्र झोडगे यांनी केली दिलीप कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रोच्चार केले साहेबराव हांडे महाराज भास्कर महाराज अवचिते रमेश महाराज शेळके जालींदर महाराज थोरात यांनी सत्संग सोहळ्याला सुरेख साथ दिली जगदंबा ढोल पथकामुळे मिरवणूकीची शोभा वाढली त्याचे नियोजन अतिष मुथ्था यांनी केले होते रमेश थोरात यांनी साऊंड सिस्टीम दिली तर विशाल आंबेकर यांनी मंडप डेकोरेशन केले जि प सदस्य शरद नवले यानी सर्वांचे आभार मानले प्रदिप नवले यांच्या मार्गदर्शनाखाली विरभद्रेश्वर बाल मंडळाने छान व्यवस्था केली या सत्संग सोहळ्यास मोठ्या प्रामाणात भाविक उपस्थित होते