नशेत गंमत करायला गेले अन अंगाशी आले

नशेत गंमत करायला गेले अन अंगाशी आले
बेलापुरचा आठवडे बाजार वेळ सायंकाळची एक जण पुलावरुन प्रवरा पात्रात उडी घेतो त्याला वाचविण्यासाठी अनेक तरुण जिवाची पर्वा न करता नदीत उड्या मारतात त्याला सहीसलामत बाहेर काढतात अन तो निघतो बेवडा.
बेलापुरला रविवारचा आठवडे बाजार असतो येथुन जवळच असलेल्या केसापुर येथील तिन जण सायंकाळच्या वेळेस पुलावरुन चालले असता पुलाच्या कोपऱ्यावरच गाडीचे पेट्रोल संपते अन मग काय करायचे अशा विचारातच आणखी थोडी टाकुन येवु असे करुन तिघेही निघाले.
अन मौज मस्ती करता करता एकाने अचानक पुलावरुन नदी पात्रात उडी घेतली काही क्षणात अनेक जण मदतीला धावले काही तरुणांनी मागचा पुढचा विचार न करता त्याला वाचविण्यासाठी नदी पात्रात उड्या घेतल्या पुलावर मोठी गर्दी जमली.
पोलीसही आले त्याला सुखरुप बाहेर काढले त्याची चौकशी केली असता तो केसापुरातील निघाला त्याचे साथीदारही आले खरी गंमत समजल्यावर बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे हरीष पानसंबळ भरत तमनर संपत बडे यांनी त्यास पोलीस स्टेशनला नेले पोलीसी भाषेत समजावुन सांगीतले अन त्या सर्वांना त्याच्या घरच्यांच्या ताब्यात दिले गंमत करायला गेले अन अंगाशी आले अशी अवस्था त्यांची झाली.