निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या अध्यक्षपदी शेळकेच

निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या अध्यक्षपदी शेळकेच
राहुरी तालुका/अशोक मंडलिक
– निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या अध्यक्षपदावरून कृती समितीमध्ये दोन गट झाले होते. बहुतांश निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या सक्रिय सदस्यांनी तत्कालीन अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे यांना अध्यक्षपदावरून हटविले होते. निळवंडे पाटपाणी कृती समितीने मोठा संघर्ष केला असून यामध्ये फूट पाडायला नको म्हणून समितीला मानणाऱ्या अनेकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वाद मिटू शकला नाही. त्यानंतर ज्ञानेश्वर वर्पे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून आपणच अध्यक्ष असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वीच निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या सर्व सक्रिय सदस्यांनी मिळून मा. धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांच्याकडे निळवंडे पाटपाणी कृती समिती या नावाने संस्था रजिस्टर नोंदणी केली. त्यानंतर दोन दिवसांनी ज्ञानेश्वर वर्पे यांनीदेखील याच नावाने धर्मदाय आयुक्त यांच्याकडे निळवंडे पाटपाणी कोण समिती या संस्था नोंदणीसाठी अर्ज केला. माननीय धर्मादाय आयुक्त यांनी देखील निळवंडे पाटपाणी कृती समिती या नावाने परवानगी दिली. यावर निळवंडे पाटपाणी कृती समितीचे सक्रिय सदस्य सुखलाल गांगवे व सौरभ शेळके यांनी हरकत घेतली. या हरकतीच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षांपासून गेल्या दोन वर्षांपासून सहाय्यक आयुक्त प्र. रा. सातव यांच्या समोर हा खटला सुरु होता.निळवंडे पाटपाणी कृती समितीचे संस्थापक नानासाहेब शेळके हेच असल्याचे सिद्ध झाले. त्यांनीच सर्वात प्रथम निळवंडे पाटपाणी कृती समितीची स्थापना करून प्रथम रजिस्टर नोंदणी केले असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे ज्ञानेश्वर वर्पे यांनी आपल्या संस्थेचे नाव पुढील तीन महिन्यात बदलून घ्यावे अन्यथा संस्था नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल असा आदेश सहाय्यक आयुक्त सातव यांनी दिला. निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने ऍड. एस बी गायकवाड यांनी काम पाहिले. यावेळी नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, अण्णासाहेब वाघे, विठ्ठल घोरपडे, दत्ता भालेराव, प्रभाकर गायकवाड, सौरभ शेळके, राजेंद्र सोनवणे, सुखलाल गांगवे, शिवाजी शेळके, दिनकर कडलक आधी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते
हे कोणत्याही लाभाचे पद नसून हे संघर्षाचे पद असल्याची मला जाणीव आहे. वीस वर्षांपूर्वी स्थापन केलेली समिती आजही तशीच आहे.दोन भावाभावांचे पटत नाही, इथे तर 182 गावातील लोक आहे. आशा लहान-मोठ्या घटना घडणारच आहे. निळवंडेचे पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहणार आहे.
– नानासाहेब शेळके, अध्यक्ष, निळवंडे पाटपाणी कृती समिती