अपंगांचा पाच टक्के निधी तात्काळ वितरित करा व घरकुल योजनेच्या अंतर्गत अपंगांना प्रथम प्राधान्य द्यावे

-
अपंगांचा पाच टक्के निधी तात्काळ वितरित करा व घरकुल योजनेच्या अंतर्गत अपंगांना प्रथम प्राधान्य द्यावे.
शिवसेना अपंग सहाय्य सेनेची मागणी.
“तालुका प्रमुख संजय शामराव पा. झांबरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगर पालिकेला निवेदन सादर”
अपंगांचा ( दिव्यांग ) पाच टक्के निधी तात्काळ वितरित करावा घरकुल योजनेच्या अंतर्गत अपंगांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांची वेगळी यादी जाहीर करण्यात यावी व शासन निर्णय नुसार अपंगांना प्रथम प्राधान्य आहे तरी पण अपंगांना घरकुलांसाठी प्राधान्य देण्यात आले नाही, वेगळी यादी सुध्दा तयार करण्यात आली नाही, भारतीय संविधानामध्ये व शासन निर्णयानुसार अपंग बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना व सुविधा देण्यासाठी तरतूद असुन, भारत सरकार व महाराष्ट्र सरकार अपंग बांधवांसाठी विविध योजना शासन स्तरावरून राबवत असुन, राहुरी नगर पालिका प्रशासन अपंग बांधवांविषयी उदासीन दिसते. अपंगांना प्रश्न पडला आहे की, निसर्गाने आमच्यावर अन्याय तर केलाच परंतु भारतीय राज्य घटनेने व शासन निर्णयानुसार अपंगांना काही अधिकार दिले आहे, तरीही राहुरी नगर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी अपंग बांधवांवर अन्याय का करत आहे. या सर्व अपंग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी
शिवसेना अपंग सहाय्य सेना, जिल्हा प्रमुख, जालिंदरजी लहामगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संजय शामराव पा. झांबरे राहुरी तालुका प्रमुख, शिवसेना अपंग सहाय्य सेना, राहुरी. तसेच सौ. सुनिता संजय पा. झांबरे राहुरी तालुका ( महिला आघाडी ) प्रमुख शिवसेना अपंग सहाय्य सेना राहुरी यांच्या नेतृत्वाखाली व शिवसैनिकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. तसेच वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण (मान्य) करून अपंग बांधवांना न्याय द्यावा व त्वरित अपंगांचा पाच टक्के निधी वितरित करा व घरकुल योजनेच्या अंतर्गत अपंगांना प्रथम प्राधान्य देऊन, अपंगांची घरकुल यादी तयार करून प्रसिद्ध करावी व या मागण्या मान्य केल्या बद्दल आम्हाला अवगत करावे.