श्रीकांत भालेराव यांनी पत्नी कै. गौरी श्रीकांत भालेराव यांच्या स्मरनार्थ

श्रीकांत भालेराव यांनी पत्नी कै. गौरी श्रीकांत भालेराव यांच्या स्मरनार्थ
टाकळीभान व परीसराची गेली पाच दशके वैद्यकिय सेवा करणारे डाॕ. श्रीकांत भालेराव यांनी पत्नी कै. गौरी श्रीकांत भालेराव यांच्या स्मरनार्थ जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लिहीते व्हावे यासाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आसल्याची माहीती त्यांची कन्या डाॕ, सोनल भालेराव यांनी दिली आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धांबाबत माहीती देताना त्या म्हणाल्या कि, जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी या स्पर्धांसाठी पाञ आसनार आहेत. निबंध लिखाणासाठी संत ज्ञानेश्वर, कोव्हीड एक आनुभव, सेंद्रीय शेती काळाची गरज, स्पर्धा परीक्षेतील मराठी विद्यार्थी असे विषय देण्यात आलेले आहेत. निबधासाठी एक हजार ते बाराशे शब्दांची मर्यादा देण्यात आलेली आहे. निबंध हा मराठी भाषेतच सुवाच्च अक्षरात लिहीलेला असावा. मराठी मातृभाषा नसलेल्या विद्यार्थ्यांनी इंग्रंजी भाषेत निबंध पाठवला तरी तो स्विकारला जाईल माञ त्या विद्यार्थ्याला फक्त उत्तेजनार्थ बक्षिस दिले जाईल.निबंध लिहीताना संदर्भासाठी वर्तमानपञे किंवा ईंटरनेटचा संदर्भ घेतला तरी चालेल माञ संदर्भ जसाच्या तसा घेणारे निबंध बाद केले जातील. एका शाळेतुन किंवा महाविद्यालयातुन कितीही विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होवु शकतात. शालेयमुलांनी लिहीते व्हावे यासाठी हा उपक्रम राबवला जात आसुन प्रथम क्रमांकाला १ हजार १ रुपये व प्रमाणपञ, द्वीतीय क्रमांकाला ७०१ रुपये प्रमाणपञ, तृतिय क्रमांकाला ५०१ रुपये व प्रमाणपञ तर उत्तेजनार्थ २५१ रुपयाचे बक्षिस व प्रमाणपञ देण्यात येणार आहे. १५ डिसेंबर २०२२ पर्यंत डाॕ. सोनाली श्रीकांत भालेराव, ‘ नंदनवन ‘ महात्मा फुले हौसिंग सोसायटी नं.२ ,वार्ड नं. १ , श्रीरामपुर जि अहमनगर या पत्यावर साहीत्य पाठवावे असे आवाहन केले आहे.