श्रीरामपूर तालुक्यातील अखेर तीन वर्षाच्या बालकाचा मृतदेह व खुनी आरोपी मिळाला

श्रीरामपूर तालुक्यातील अखेर तीन वर्षाच्या बालकाचा मृतदेह व खुनी आरोपी मिळाला
टाकळीभान प्रतिनिधी ः-अखेर त्या तीन वर्षाचे बालकाचा मृतदेह श्रीरामपूरचे पोलिसांनी पाच दिवस अथक प्रयत्न करून परिसरात मक्याच्या शेतात शोधून काढला,
श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन 3 वर्षाच्या मुलाचा अपहरणाचा गुन्हा रजिस्टर नंबर 470/124 रोजी दिनांक 3 9 2024 रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला अपहरण किडनॅपिंग चा गुन्हा दाखल झाला होता,
त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय संदीप मुरकुटे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र त्रिभुवन पोलीस कॉन्स्टेबल चांद पठाण गुन्हा घडताच त्यांनी आरोपी नामे राहुल पोपटी बोधक राहणार चांदेगाव तालुका वैजापूर पकडण्यासाठी शिवर बंगला तालुका वैजापूर या हद्दीत रवाना झाले आरोपीचा मोबाईल लोकेशन शिवर बंगला भटाणा या ठिकाणी येत होता, सदर टीमने आरोपीचा मोबाईल लोकेशन वरून ट्रॅप झाल. दिशाभूल करण्यासाठी सध्याचा मोबाईल एका झुडपात टाकण्यात आला होता ,त्यामुळे आरोपीचा शोध लागत नव्हता किडनॅपिंग झाल्याच्या मुलाचा शोध लागत नव्हता परंतु सदर टीमने रात्रभर थांबून आरोपी घरी येताच त्याला ताब्यात घेतल सदर आरोपी हा सदर मुलाला शिवर बंगला ते बटना आवरा या भागात शेतात गळा दाबून टाकून दिले आहे.
बाबत सांगत होता सदरच्या टीमने पूर्ण वीस किलोमीटर मक्याचे शेत चेक केले असता त्यांना तेथे मुलाची डेड बॉडी किंवा मुलगा सापडला नाही सदर आरोपीने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी सदर ठिकाणी सांगत होता त्यामुळे वरील टीमचे तीन ते चार दिवस मक्याची शिवार चेक करण्यासाठी गेले परंतु त्यांना काही हाती लागले नाही म्हणून वरिष्ठांच्या आदेशाने टेक्निकल पॉईंटने सदर आरोपीचा प्रत्येक फुटेज चेक केला असता सदर आरोपी हा शिऊर बंगला चौकात पेट्रोल पंप येथे सकाळी मुलासह दिसला म्हणून वरील टीमने विरुद्ध दिशेने तपास चालू केला शिऊर बंगला ते संभाजीनगर जाणाऱ्या रोडने गारच या ठिकाण पर्यंत सदर मुलगा आरोपीच्या गाडीवर जाताना दिसला व त्यात त्याचे बिंग फुटले सदर आरोपीने मुलास गारच शिवारात गळा दाबून मारून टाकले आहे.
सदर मुलाची डेड बॉडी गारशिवरात तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती नगर या भागात भेटली असून त्यावर पीएम चालू आहे. व आरोपी नामे रोहण बोधक राहणार चांदेगाव याच्यावर मर्डरचा वाढीव कलम लावण्याची काम चालू आहे. सदरची कामगिरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस पीएसआय संदीप मुरकुटे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू त्रिभुवन पोलीस कॉन्स्टेबल चांद पठाण व त्यांच्या टीमने दिवस रात्र प्रयत्न करून सदर गुन्हा उघडीस आणला आहे. त्यांना पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कलबुर्मे तसेच डी वाय एस पी साहेब व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली सहजता गुन्हा उघडीस आणण्यास मदत मार्गदर्शन झाले आहे श्रीरामपूर पोलिसांचे वैजापूर ग्रामस्थ व श्रीरामपूरच्या ग्रामस्थांनी कौतुक केले.