मनोरी गणपत वाडी रस्ता गेला खड्ड्यात

मनोरी गणपत वाडी रस्ता गेला खड्ड्यात.
राहुरी तालुक्यातील मानोरी गणपत वाडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यामध्ये मोठ मोठाले खड्डे पडल्याने जास्त प्रमाणात पाणी साचल्याने या रस्त्याने प्रवास करणे कठीण झाले आहे त्यामुळे रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे अशी नागरिकांची मागणी होत आहे गणपतवडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यात पावसाचे दिवस सुरू असल्याने या रस्त्यावरील सर्व खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे गणपतवाडी रस्ताच खड्ड्यात केल्याचे चित्र दिसून येत आहे या रस्त्यावरून दैनंदिन शेतकरी तसेच शाळकरी मुलं प्रवास करत असतात रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवास करणे जीवावर भेटल्यासारखे चित्र बनले आहे त्यामुळे रस्त्याचे काम करावे अशी मागणी येथील उपसरपंच अण्णासाहेब तोडमल भाऊसाहेब आढाव विलास वाघ दीपक खुळे, गोविंद आढाव किशोर आढाव गंगा बाचकर संजय देवकाते बाळासाहेब चोथे विलास सोडणार आदिनाथ काळे मंगेश तनपुरे भास्कर आढाव बाळू भिंगारे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.