राजकिय

शंकरराव गडाख यांनी निष्ठा जपली -उद्धव ठाकरे

शंकरराव गडाख यांनी निष्ठा जपली -उद्धव ठाकरे

 

मी राज्यभर फिरतोय, माझ्या कडे पक्ष चिन्ह नाही तरीही तुम्ही प्रेम करतात. मी नतमस्तक होतो. माझ्याकडे तुम्हाला द्यायला विश्वास आहे. २०१९ मध्ये अपक्ष निवडून आले आणि आपल्याकडे आलेत मंत्रिपद दिले. आज तिकडे गेले असते तरी त्यांना मंत्रिपद दिले असते पण गडाख यांनी निष्ठा ठेवली ते तिकडे गेले नाही सोनईतील माझे मर्द मावळे अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी आ.शंकरराव गडाख यांचे कौतुक केले.

नेवासा तालुक्यातील सोनई येथे आयोजित शिवसंवाद मेळाव्यात शिवसेना ऊबाठा प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.
खासदार संजय राऊत आमदार शंकरराव गडाख , अंबादास दानवे, माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे वरुण सरदेसाई शिवसेनेचे जिल्ह्यातील- तालुक्यातील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणाले की,अशोक चव्हाण  कालपर्यंत आमच्याशी जागा वाटपाबाबत बोलत होते. ते अचानक भाजपसोबत गेले, भाजप  ४०० पार बोलले आणि घाबरले आहेत. अर्थसंकल्पानंतर श्वेत पत्रिका काढली. त्यात आदर्श घोटाळा आणि अशोक चव्हाण यांचे नाव आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या क्लिप आहेत. आदर्शमधील डीलर म्हणून त्यांचा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. ‘ मला नाही अब्रू मी कशाला घाबरू, अशी भाजपची परिस्थिती आहे, जे घाबरतात ते भाकड पक्षात जातात, मोदीना वाटत नेते गेले की जनता ही त्यांच्या पाठीमागे जाईल परंतु तस होणार नाही अशी कडाडून टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला पाठवताय मोदींना हे शोभत नाही, तुम्ही देशाचे की, गुजरात चे पंतप्रधान आहेत. मी त्यांना हुकूमशाह बोलतो. इथे शेतकऱ्यांना काही मिळत नाही, आणि गद्दारी करणाऱ्यांना खोके मिळतात. 

 युवा नेते उदयन गडाख हे व्यासपीठा वर न बसता खाली तरुण कार्यकर्त्या समवेत बसुन घोषणा देत होते.

 आमच चूल पेटवनार हिंदुत्व आहे , घर जाळणार हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. अस म्हणताच समोर असलेल्या जनसमुदायाने टाळ्या वाजुन दाद दिली.

3.7/5 - (3 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे