लोकशाहीचे दोन शत्रू हुकूमशाही आणि माणसा माणसात भेद करणारी संस्कृती बाबासाहेबांच्या या घोषवाक्याच्या सह आळंदीत जल्लोषात मिरवणूक*

*लोकशाहीचे दोन शत्रू हुकूमशाही आणि माणसा माणसात भेद करणारी संस्कृती बाबासाहेबांच्या या घोषवाक्याच्या सह आळंदीत जल्लोषात मिरवणूक*
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचा जल्लोष आळंदी मध्ये आज पहावयास मिळाला. आळंदीतील सिद्धार्थ ग्रुप यांच्या विशेष नियोजनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली महू गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाची प्रतिकृती मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. लहान थोर महिला पुरुष सर्वजण डॉक्टर बाबासाहेबांच्या उपकाराचे गुणगान गात उत्साहात आनंद घेताना दिसून आले. आळंदीतील श्री भैरवनाथ महाराज चौकातून सदर मिरवणुकीला प्रारंभ झाला. लोकशाहीचे दोन शत्रू हुकुमशाही आणि माणसा माणसात भेद करणारे संस्कृती या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषवाक्य ची मोठी प्रतिमा चित्ररथाला लावून महू गावातील जन्मस्थळाची आकर्षक चित्रकृती साकारण्यात आली होती. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मी त्या धर्माला मानतो जो धर्म समता बंधुता आणि स्वातंत्र्य देऊ शकेल याही घोषवाक्याला हायलाईट करत चित्ररथाला लावण्यात आलं होते. सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा उत्साह आळंदीमध्ये दिसून येत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या भव्य प्रांगणा बाबासाहेबांच्या पुतळ्याला आभाळ वृद्धांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केल्याचे दिसून आले आकर्षक विद्युत रोषणाई फटाक्यांची आतषबाजी आणि गाण्याचे तालावर फिरकणारे पाऊल यामुळे मनमोहक वातावरण होते. आळंदी पोलीस स्टेशनकडून तो बंदोबस्त सदर मिरवणुकीच्या अनुषंगाने करण्यात आला होता या मिरवणुकीमध्ये पुरुषांबरोबरच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता आणि चौकात चौकामध्ये फटाक्यांच्या आतिश्वागिनी जल्लोषाचा आनंद व्दिगुणित होताना दिसला. आळंदीतील सिद्धार्थ ग्रुप हा विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो तसेच सिद्धार्थ ग्रुपच्या वतीने दरवर्षी आकर्षक सजावटीचे चित्ररथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त साकारले जातात ती परंपरा यावर्षी कायम ठेवत अक्षय आठ यांनी आकर्षक अशी चित्रकृती उभारली होती. मागील वर्षी सिद्धार्थ ग्रुप यांच्या सहयोगाने संविधानाची ताकद दाखवणाऱ्या विविध कलमांचा उल्लेख असलेला चित्र हा या मिरवणुकीचा केंद्रबिंदू होता तर यावर्षी महू गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळी असणाऱ्या स्मारकाची हुबेहू प्रतिकृती साखर आळंदीतील मिरवणुकीने सर्व आभाळविरुद्ध व आळंदीकर ग्रामस्थांचे लक्ष वेधले सायंकाळी पाचच्या सुमारास या मिरवणुकीला आळंदीतील श्री भैरवनाथ महाराज मंदिर चौकातून सुरुवात झाली. सदर मिरवणूक भैरवनाथ चौक लक्ष्मी माता मंदिर चौक आळंदी पोलीस स्टेशन मार्गे नगरपरिषद चौक महाद्वार चौक चावडी चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा मार्गाने मार्गक्रमण झाली. भीम बांधवांच्या घराघरांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले