जळगावातील शेतीची नवनविन तंत्रज्ञान पाहुन शेतकरी गेले भारावुन शेतकरी सहल ठरली लाभदायी

जळगावातील शेतीची नवनविन तंत्रज्ञान पाहुन शेतकरी गेले भारावुन शेतकरी सहल ठरली लाभदायी
जळगाव येथील जैन इर्रीगेशन कंपनी व जैन हाईटेक प्लँट फँक्टरी या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपण कसत असलेली परंपरागत शेती सोडून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुनच शेती करण्याचा निर्धार बेलापुरातील शेतकऱ्यांनी बोलून दाखविला. सार्थक एजन्सी व बेलापुर विविध कार्यकारी संस्थेच्या वतीने जळगाव येथील कै.भवरलालजी जैन यांच्या संशोधनातुन व योगदानातुन उभारलेल्या जैन प्रकल्पाची पहाणी करण्यात आली.शेती करण्याच्या नवनविन पद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना आपल्या जीवनात कसा वापर करता येईल या उद्धेशाने सहलीचे नियोजन करण्यात आले होते.छं.श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सहल जळगाव करीता रवाना झाली.जैन प्रकल्पाचे संचालक अभय जैन यांनी सर्वांच्या निवासाची व जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती.दुसऱ्या दिवशीं सकाळी सात वाजता आमची सहल मार्गदर्शकासह सुरु झाली. आंबा, पेरु, सिताफळ, डाळींब, सत्रा,नारळ, लिंबु,चिकु,केळी सफरचंद या फळबागाची पहाणी केली,संबधीत मार्गदर्शक प्रत्येक फळबागेविषयी सविस्तर माहीती देत होते.फळबाग लागवड करताना सरी किंवा बेड पुर्व पश्चिम दिशेनेच पाडावे जेणे करुन प्रत्येक झाडाला भरपुर सुर्यप्रकाश मिळाला पाहीजे. वेगवेगळ्या फळ पिकाच्या दोन झाडामधील अंतर किती असावे याचीही माहीती देण्यात आली .फळझाडांची उंची ही मर्यादित ठेवली पाहीजे हे सर्व फळबागाची पहाणी करताना सांगण्यात आले,त्याचे कारण फळांची काढणी व रोगराई व्यवस्थापन सोईस्कर व्हावे.फळ बागेला खते व पाणी कसे द्यावे याची सविस्तर माहीती देण्यात आली.पाणी थेंबान अन पिक जोमान हा मुलमंत्र सर्वांनी जपावा तसेच पाणी अमूल्य आहे त्याचा अति वापर करु नका ते पिकालाही अन जमिनीलाही मारक आहे हे तज्ञव्यक्तीकडून प्रात्याक्षीकासह दाखविण्यात आले. फळबाग तसेच पिकांना आवश्यक तेवढेच पाणी देण्याकरीता निर्माण केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रीप नळ्यांची माहीती देण्यात आली. मिनी स्प्रिंकलर, मायक्रो स्प्रिंकलर, रेनपोर्ट,मेटल इम्पँक्ट स्प्रिंकलर, रेनगन, प्लास्टिक इम्पँक्ट स्प्रिंकलर ,क्विक कनेक्ट पाईप, त्याची वापरण्याची पद्धत ,येणारा खर्च, होणारी बचत,मिळणारे शाश्वत उत्पन्न या विषयी सखोल माहीती देण्यात आली.पिकाला पाणी देण्याकरीता स्वयंचलित सेफ्टीवाँल्व यंत्रणा दाखवीण्यात आली. वेगवेगळी फील्ट्रेशन संसाधने,सँण्ड सेपरेटर व पॉली फिटींग्ज याची प्रात्यक्षिकासह माहीती देण्यात आली.ठिंबक सिंचन यंत्राचा वापर केल्याने ७०% पाण्याची बचत होते त्यामुळे तेवढ्या पाण्यात अधिक क्षेत्र लागवडीखाली आणता येते,तसेंच पीकही लवकर हाती येते.खत वापराची कार्यक्षमता ५०% पर्यत वाढते खताचा खर्च,अंतर मशागतीचा खर्च व मजुरीच्या खर्चातही बचत होते तसेच चढ उताराच्या जमीनीतही एकसारखा पाणी पुरवठा होतो याची महत्वपुर्ण माहीती मिळाली.ही सर्व माहीती घेवुन आम्ही पुढे कांदा लागवड सिंचन पध्दतीची माहीती घेण्यासाठी गेलो. बेड पध्दतीने लागवड केलेले कांदे व पिकावर रोग व किडी प्रादुर्भाव न होण्यासाठी आसपास लागवड केलेली फुलझाडे याचेही ज्ञान अवगत झाले.प्रत्येक पीकात झेंडु सारखी फुलझाडे लावावीत हे आवर्जुन सांगण्यात आले. फुल झाडामुळे मधमाशी येते व परागीभवन चांगल्या प्रकारे होते.
रासायनिक औषधाच्या अति वापरामुळे निसर्गातील मधमाशीचे प्रमाण कमी होत चालले असुन मधमाशी संपली तर मानवी जीवनचं काय संपूर्ण जिवसृष्टी देखील नाहीशी होईल त्यामुळे रासायनिक औषधाचा वापर कमी करण्याचाही सल्ला मार्गदर्शकांनी दिला.दौरा यशस्वी होण्याकरिता जैन कंपनी चे जिल्हा व्यवस्थापक श्री सचिन डोंगरे तसेच श्री अजय डाकले व संतोष डाकले यांनी मार्गदर्शन केले.या सहलीत बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले ,विलास मेहेत्रे ,ज्ञानदेव वाबळे ,दत्ता कुऱ्हे विजय खंडागळे ,देविदास देसाई संतोष डाकले ,भरत साळूंके ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक अशोक कुऱ्हे अय्याज सय्यद ,जाकीर शेख ,विश़्वनाथ गवते ,कलेश सातभाई ,किरण नवले ,सुरेश कापसे ,डाँक्टर मिलींद बडधे ,नामदेव बोंबले ,अनिल पवार ,विपुल नवले ,सौरभ पवार, हरिष बडाख ,आदिसह अनेक सभासद सहलीत सहभागी झाले होते .पहाटे चार वाजता आम्ही सुखरुप बेलापुरात उतरलो पण येताना शेतीकरीता नविन ऊर्जा घेवुनच