कापूस घेऊन पूजा मोरे राहुल गांधींना भेटल्या. कापूस आणि ऊस उत्पादकांच्या वेदना राहुल गांधीनी त्याचदिवशी भाषणात मांडल्या*.

*कापूस घेऊन पूजा मोरे राहुल गांधींना भेटल्या. कापूस आणि ऊस उत्पादकांच्या वेदना राहुल गांधीनी त्याचदिवशी भाषणात मांडल्या*.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने भारतच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घ्यावेत आणि सर्व जाती-धर्मांमध्ये भाईचारा निर्माण व्हावा यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली . ही यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन मरणाचे प्रश्न राहुल गांधी यांना समजावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे यांनी कळमनुरी येथे राहुल गांधी यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले एवढेच नाही तर स्वतः त्या राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेमध्ये दहा मिनिटं चालण्याची संधी त्यांना मिळाली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न राहुल गांधी यांना तात्काळ लक्षात यावेत यासाठी कपाशीचा हार राहुलजींना भेट देऊन मराठवाड्याच्या भूमीत त्यांनी स्वागत केले व कपाशी, सोयाबीन व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. केंद्रसरकारने कापसावरील आयात शुल्क माफ केले व निर्यात बंद केल्याने देशातील कापूस उत्पादकांचे भाव गडगडले या संदर्भातही आवाज उठवावा याकरिता राहुल गांधी यांना आवाहन केले.सोयाबीनची भुकटी जर केंद्र सरकारने निर्यात करायला परवानगी दिली तर सोयाबीनचे भाव वाढतील अश्या समस्या मांडल्या. तसेच केंद्र सरकारने उसाच्या रिकव्हरीचा बेस बदलल्याने ऊस उत्पादक अडचणीत सापडला आहे. त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करावा याविषयी चर्चा केली या चर्चेचे फलित म्हणजे राहुल गांधी यांनी रात्री झालेल्या सभेमध्ये पूजाताई मोरे यांनी त्यांच्यासमोर मांडलेले सर्व प्रश्न उपस्थित केले आणि या प्रश्नांना वाचा फोडली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री. गजानन बंगाळे देखील उपस्थित होते