लेखिका,कवयित्री रंजना सानप यांना राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर

लेखिका,कवयित्री रंजना सानप यांना राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले आहे.त्यांच्या विचारांना आदर्श मानून सामाजिक, शैक्षणिक,राजकीय व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या लेखिका,कवयित्री रंजना सानप यांना सामाजिक बांधिलकी मानून त्या करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन आम्ही भारतीय महिला मंच व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर झाला आहे.
आम्ही भारतीय महिला मंच व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्था तथागत बुद्ध, माता सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले,लोकराजे राजर्षी शाहू महाराज,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी अभिप्रेत असणाऱ्या प्रबोधनाच्या चळवळींमध्ये कार्यरत आहेत.
राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार समारंभ रविवार दि. 29 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11:00 वा.राजर्षी शाहू स्मारक भवन,दसरा चौक,कोल्हापूर येथे होणाऱ्या पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार संजय आवटे,सुप्रसिद्ध कवयित्री दिशा पिंकी शेख,सुप्रसिद्ध कवी व लेखक डॉ. सतीशकुमार पाटील,धम्म अभ्यासक विजया कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड.मंचकराव डोणे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार गोंधळी,धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड.करुणा विमल,ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे, संविधानाचे अभ्यासक डॉ.श्रीपाद देसाई, ॲड.अकबर मकानदार, निती उराडे,प्रा.प्रकाश नाईक या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती संयोजक अनिल म्हमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदर पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.दयानंद ठाणेकर,सुरेश केसरकर यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला प्रा.डॉ. शोभा चाळके,तात्यासाहेब कांबळे, विमल पोखर्णीकर, सनी गोंधळी,अनुष्का माने, सिद्धार्थ कांबळे, अरहंत मिणचेकर उपस्थित होते.