टाकळीभान येथे सन १९९५ दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिमाखात साजरा.

टाकळीभान येथे सन १९९५ दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिमाखात साजरा.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील न्यु इंग्लीश स्कुल व कै.आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील सन १९९५ या वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावारविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या उत्सहात व दिमाखात येथील जि.प.प्राथमीक शाळेच्या प्रांगणात सपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन बॅचचे चित्रकला विषयाचे शिक्षक जे.डी.शेख सर हे होते.
या स्नेहमेळाव्यासाठी माजी शिक्षक आर.पी.शिंदे, चांदेकर सर, जे.डी.शेख, बी.आर. चव्हाण, दहिफळे, सोनकांबळे, गोतीस, कुर्हे, अनिल पटारे, आभाळे, के.डी. बनसोडे, माजी शिक्षिका आभाळे मॅडम, लोंढे, गलांडे आदीसह न्यु इंग्लीश स्कुलचे विद्यमान शिक्षक आदीनाथ पाचपिंड, सुरेश गलांडे आदी उपस्थित होते.
तब्बल २७ वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास ५० ते ५५ विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्यास हजेरी लावली होती.
प्रथमत: विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित माजी शिक्षकांनी आपली ओळख करून दिली. व सध्या ते कुठे वास्तव्यास आहे. मुले काय करतात याबद्दल माहीती देवून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित माजी शिक्षकांचा भेटवस्तू देवून यथोचित सन्मान करण्यात आला. तद्नंतर सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थींनींनी आपला परिचय करून देत सध्या आपण कुठे राहता? काय करता? कुठल्या पदावर आहात याबद्दल ओळख परेड करून दिली. मुलींनी सुरूवातीचे शाळेतील नाव आताचे नावे यावेळी सांगीतली. या कार्यक्रमात तत्कालीन शिक्षकांनी २७ वर्षानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला व या आठवणी नव्याने पल्लवीत झाल्या. त्यावेळी शिक्षणाचे धडे गिरवलेल्या दहावी अ च्या वर्गात आपआपल्या बाकावर बसण्याची संधी या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्राप्त झाली. सरांची व विद्यार्थ्यांची आठवणींची जणू मैफीलच यावेळी रंगली होती.२७ वर्षानंतर पहिल्यांदाच काहीजण भेटत असल्याने त्या भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे जाणवत होता. सदरचा कार्यक्रम हा सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरू होवून ३.३० वाजेच्या दरम्यान या उत्कृष्ठ अशा जेवणाचा आस्वाद घेत हास्यकल्लोळात या स्नेहमेळाव्याची सांगता झाली. यावेळी उभारलेला मंडप व त्या मंडपात उपस्थित असणारे शिक्षक व रंगीबेरंगी पोषाख परिधान केलेले विद्यार्थी—विद्यार्थींनी लक्ष वेधून घेत होते.
या कार्यक्रमासाठी प्रशांत जंगम, गिरीश मगर, हरिभाऊ जगताप, अजय घोडके, वर्षा पटारे, सोनल सोमाणी, सुनिता संत, वैशाली भोसले, संदीप बोडखे, सदाशिव बहिरट, मंगल शिंदे, अनिता पवार, ज्योती भवार, सुरेखा साळूंके, सुनिता जाधव, मनिषा निधे, सिमींतीनी चव्हाण, सुनिता गायकवाड, शालीनी भवार, ज्योती नाईक, सविता नाईक, साबळे, सोमनाथ चंदणे, रावसाहेब बहिरट, दत्तात्रय मोटकर, पोपट बोडखे, सुरेश बनकर, कैलास वाघ, गोविंद पाबळे, राजेंद्र शेजूळ, राजेंद्र घुले, अभिजीत मिरीकर, शैलेश मगर, सुनिल कोल्हे, विठ्ठल लाड, काळू गांगूर्डे, योगेश टाकळकर, योगेश माने, शरद कापसे, सचिन जोंधळे, प्रकाश बोडखे, महेश लेलकर, विजय बहिरट, राजू बिरसने
आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत जंगम यांनी तर प्रास्तावीक गिरीश मगर व आभार हरिभाऊ जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्वच इयत्ता दहावीचे १९९५ या वर्षातील माजी विद्यार्थी प्रयत्नशिल होते.
—आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो त्या दृष्र्टीने प्रेरीत होवून माजी विद्यार्थ्यांच्या वतीने न्यु इंग्लीश स्कुल व कै.आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयास यावेळी एक छोटीशी भेट म्हणून आॅल इन वन प्रिंटर देण्यात आले. सदर प्रिंटर हे शाळेची विद्यमान शिक्षक आदीनाथ पाचपिंड व सुरेश गलांडे यांनी स्विकारले.