कृषीवार्ता
वीजेची तार तुटुन ट्रेलरसह तीन बैलगाड्या जळुन खाक, प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.

वीजेची तार तुटुन ट्रेलरसह तीन बैलगाड्या जळुन खाक, प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.
ऊसतोड सुरु आसल्याने ऊसाच्या थळातुन ऊस वहातुक करणाऱ्या ट्रॕक्टरच्या ट्रालीला लावलेल्या लाकडी डांबात वीजेची तार आडकुन तुटल्याने वीज प्रवाह सुरु आसल्यामुळे दोन तारांचे घर्षन होवुन वीजेचा लोळ खाली पडल्याने पाचरटाने पेट घेतल्यामुळे आगीचा डोंब होवुन ऊस घेवुन जाणारी ऊसाने भरलेली ट्राली व ऊसाच्या थळात सोडलेल्या तीन बैलगाड्या आगीच्या भक्शस्थानी पडुन जळुन खाक झाल्या. मदतकार्य करणाऱ्यांनी प्रासंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
टाकळीभान शिवारातील जगताप वस्ती परीसरातील गट नंबर ३२४ मध्ये भाजपाचे मुकुंद राजाराम हापसे यांची ऊसाचीशेती आहे. सध्या या ऊसाची तोडणी अंतिम टप्यात सुरु होती. शेवटच्या टप्यातील ऊसतोडणी करुन ऊसाची शेवटची खेप भरुन ट्रॕक्टर दोन ट्राल्या घेवुन ऊसाच्या थळाच्या बाहेर निघत होता. माञ लोंबकळलेली ववीजेची तार ऊस भरलेल्या ट्रेलरच्या डांबाला आडकल्याने तुटली. त्यामुळे तारेला तार लागुन घर्षन झाल्याने जाळाचा मोठा लोळ खाली पाचरटात पडला. रखरखते उन व वाळलेले पाचरट याबुळे क्षणात आगीचा डोंब उसळला व आगीने क्षणात रौद्र रुप धारण केले. ट्रॕक्टर चालकाने प्रसंगावधान राखुन आग लागलेली ट्राली तेथेच सोडुन ट्रॕक्टर व एक ट्राली घेवुन ऊसाच्या थळाच्या बाहेर आला. याच ठिकाणी ऊसतोडणी मजुरांच्या बैलगाड्या सोडलेल्या होत्या. आगीवर नियंञण मिळवता मिळवता तीन रीकाम्या बैलगाड्याही जळुन खाक झाल्या. येथील ऊसतोडणी पुर्ण झाल्याने ऊसतोडणी करणाऱ्या महीला कामगार पुढच्या थळाकडे मार्गस्थ झालेल्या होत्या. लहान मुलेही त्यांच्या सोबत गेलेली आसल्याने मोठी दुर्घटना टळली अन्यतः ती मुल बैलगाडीच्या सावलीतच बसलेली होती असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
आगीची माहीती मिळताच अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके यांनी घटनास्थळाकडे धाव घेवुन वेगाने मदतकार्य सुरु केले. अशोकचे कर्मचारी दत्ताञय बोडखे, शिवाजी पवार, शेतकरी राजेंद्र रणनवरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रसंगावधान राखत शेजारच्या ऊसाच्या शेताच्या बांधावर नांगरट करुन आगीवर काबु मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याने शेजारचे मोठे ऊसाचे क्षेञ आगीपासुन वाचवण्यात यश आले.
Rate this post