मरकळ येथील गादी कारखान्यात भीषण आग आळंदी नगरपरिषद पिंपरी चिंचवड आणि शामक दलाच्या प्रयत्नाने नियंत्रण*

*मरकळ येथील गादी कारखान्यात भीषण आग आळंदी नगरपरिषद पिंपरी चिंचवड आणि शामक दलाच्या प्रयत्नाने नियंत्रण*
मरकळ येथील गादि कारखान्यास सायंकाळी 5 वाजता आग लागल्याची वर्दी प्राप्त होताच तात्काळ आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे कार्य सुरू झाले. परंतु लागलेली आग मोठ्या प्रमाणावर असल्याने पुढील अर्ध्या तासात PMRDA आणि PCMC यांच्या अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी पोहोचल्या. साधारण 2:30 तासांच्या प्रयत्ना नंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यात आले. आग विझवण्या चे कार्य सुरू असताना कारखान्यात असलेल्या LPG gas cylinder सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याने स्फोट होण्यापासून अटकाव झाला.
गादी कारखान्या शेजारी उभ्या असलेल्या 2 ट्रक,1 पीक अप पूर्णपणे जळाले असून कारखान्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे परंतु कुठलीही जीवित हानी झालेली नाही. अशी माहिती आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे यांनी दिली आहे
सध्य स्थिती त आळंदी नगरपरिषद आणि PCMC अग्निशमन दलाच्या गाड्या माघारी आल्या असून PMRDA ची अग्निशमन गाडी घटनास्थळावर तैनात आहे.
तापमानाचा चढता पारा वातावरणातील उष्णता यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे हे आव्हान होते असे दिसून येत आहे.