श्रीमती रंजना देठे यांना राष्ट्रीय विशेष उत्कृष्ट हिंदी अध्यापन सेवा कार्य गौरव पुरस्कार…

श्रीमती रंजना देठे यांना राष्ट्रीय विशेष उत्कृष्ट हिंदी अध्यापन सेवा कार्य गौरव पुरस्कार…
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान हिंदी विषयाच्या निवृत्त अध्यापिका , ज्यांनी हिंदी विषया मध्ये आपली पूर्ण सेवा रयत शिक्षण संस्थेत दिली अशा टाकळीभान येथील आदर्श शिक्षिका श्रीमती रंजना देठे यांना ज्ञानज्योती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन व उत्कृष्ट हिंदी अध्यापन सेवा कार्य गौरव पुरस्कार या कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्रो डॉ. सदानंद भोसले, मा. सभापती डॉ. सौ. वंदनाताई मुरकुटे,ज्येष्ठ हिंदी साहित्यिक प्राचार्य डॉ. शहाबुद्दीन शेख, प्रा. डॉ. मिलिंद कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव उपाध्ये, डॉ. देवीदास बामणे, प्रा. कार्लस साठे, ग्रामीण कवी पोपटराव पटारे, ह-भ-प दत्तात्रय बहिरट महाराज, पुणे बालभारतीचे सदस्य प्रा. सुधाकर शिंदे, संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, प्रियंका चाबुकस्वार आदींच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.