राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दोन गटात राडा ; गावाला छावनीचे स्वरूप

राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दोन गटात राडा ; गावाला छावनीचे स्वरूप
राहुरी तालुक्यातील उंबरे गावात दि.२६ जुलै रोजी राडा झाल्याची घटना घडली असून अल्पवयीन मुलीचे फोटो काढल्याच्या संशयातुन एका गटाकडून दुस-या गटाला तूफान हाणामारी करण्यात आली असुन तोडफोड देखील करण्यात आली आहॆ.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला आहॆ. राहुरी तालुक्यातील उंबरे गावामध्ये अल्पवयीन मुलीचे फोटो काढण्याच्या संशयातून एका गटाने दुस-या गटावर हल्ला चढवला यामध्ये झालेल्या मारणीत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर व पुणे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेने गावामध्ये तणाव मोठा प्रमाणात निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने राञीच कोंबिंग ऑपरेशन करत सुमारे १५ जणांना ताब्यात घेतले असुन त्यांना कोर्टात हजर केले असता आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहॆ. सध्या गावांमध्ये तणाव पूर्व शांतता आहे.