आजपासून सारंगधर महाराज यात्रा उत्सव

आजपासून सारंगधर महाराज यात्रा उत्सव
राहुरी तालुक्याचा पूर्व भागातील वांजुळपोई येथील ग्रामदैवत श्री सारंगधर महाराज यात्रा उत्सव सालाबाद प्रमाणे सुरू होत असून बाल गोपाळा सह तरुण वर्ग कावडीने आणलेल्या गंगाजलाने स्नान घातल्यानंतर यात्रेस सुरुवात होते सारंगधर महाराजांची आख्यायिका पंच कृषी सह कोसो दूर पसरलेली असून शरीरावर आलेली चामखीळ महाराजांचे पाच शनिवार उपवास करून पाच मिठाच्या तसेच पाच पिठाच्या पुड्या वाहिल्यास शरीरावरील चामखीळ नाहीसे होतात
पहिल्या दिवशी सकाळी उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांचे किर्तन असून खिचडीच्या महाप्रसादाने सांगता होईल
संध्याकाळी फटाक्याच्या आतिषबाजीत छबिना मिरवणूक होऊन त्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम म्हणून तमाशाला प्रारंभ होईल दुसऱ्या दिवशी सकाळी हजरी चा कार्यक्रम होईल त्यानंतर ठीक चार वाजेच्या दरम्यान जंगी कुस्त्यांचा हंगामा होऊन यात्रा संपन्न होईल