नांदेड येथील घटनेच्या निषेधार्थ नेवासा तालुका कासार समाजाच्या वतीने आरोपीवर कंठोर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसीलदाराना निवेदन.

नांदेड येथील घटनेच्या निषेधार्थ नेवासा तालुका कासार समाजाच्या वतीने आरोपीवर कंठोर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसीलदाराना निवेदन.
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा गावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार याबाबत आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नेवासा तालुका कासार समाजाच्या वतीने नेवासा नायब तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की निवघा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील कासार समाजातील अल्पवयीन विद्यार्थिनी हिचा वर्षभर छेडछाड करून अत्याचार केला गाव गुंडाच्या छळामुळे अखेर अत्याचारीत मुलीचा 17 /7/ 2023 रोजी बळी गेला यातील गावगुंड आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन हा खटला फास्टट्रॅक कोर्टाचा चालावा यातील आरोपी गावगुंड ज्ञानेश्वर यास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी कासार समाजाच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे महिला व विद्यार्थ्यांनी मध्ये सुरक्षितेचे भावना निर्माण होण्याकरता अशा गाव गुंडावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्रजी फडणीस यांना पाठवले आहेत आपण तात्काळ नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश देऊन ज्ञानेश्वर पवार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून सदर आरोपीस अटक करण्यात यावी अशी मागणी नेवासा तालुका कासार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे व झालेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी श्रीधर कुंभकर्ण प्रफुल्ल पाथरकर कुकाना संतोष भाऊ कुंभकर्ण सोनई योगेश रासने किरण कुंभकर्ण कैलास कुंभकर्ण नेवासा अनंत रासने खामगाव गणेश पाथरकर अरुण रासने नेवासा फाटा प्रदीप कुंभकर्ण वरखेड बंडू गोसावी सलाबदपूर बालू डांगरे नेवासा व कासार समाजाचे समाज बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.