कोरोना बाधित रुग्ण पोलिसांना गुंगरा देत झाला पसार

- कोरोना बाधित रुग्ण पोलिसांना गुंगरा देत झाला पसार
चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपीला कोरोना झाल्यामुळे त्याला औषध उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आरोपीने हातातील बिडी तोडून पलायन केल्याची घटना उघडीस आली,
याबाबत सविस्तर वृत्त असे की शनि शिंगणापुर तालुका नेवासा, पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी माळसपिंपळगाव येथील मोहिते याला कोरणाची लागण झाल्यामुळे वैद्यकिय अधिकाऱ्याने त्याला बुधवारी आंतररुग्ण विभागात दाखल करून उपचार सुरू केले गुरुवारी दिनांक 13 रोजी औषध उपचार सुरू असताना आरोपी मोहिते यांनी पोलिसांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना गुंगारा देत हातातील बेडी तोडून पलायन केले ही घटना उघडकीस येताच आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली मात्र तो उशिरापर्यंत पोलिसांना मिळाला नाही त्यामुळे आरोपींचा शोध घेणे सुरू आहे आरोपी हा कोरोना बाधित असल्याने इतरांनाही या आजाराचा फैलाव होण्याची भीती आहे त्याच्यावर शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात भा द वि कलम 394 नुसार गुन्हा दाखल आहे कराना बांधीत रुग्णावर उपचार सुरू असताना त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसाची नेमणूक केली असतानाही पोलिसांना गुंगारा देत आरोपी पळून गेला याची चर्चा सध्या जनता आहे
प्रतिनिधी सोनई
मोहन शेगर,