महसुलच्या आशिर्वादाने वाळू उपसा, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ?

महसुलच्या आशिर्वादाने पेडगाव मध्ये वाळू उपसा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ?
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव (बहाद्दुरगड) येथील भवानीमाता मंदीराजवळ भिमा नदीपात्रात महसुल अधिकाऱ्यांच्या अशिर्वादाने १४ जेसीबी २५ टॕक्टर व ६ हायवाच्या साह्याने दिवसरात्र बेसुमार वाळू उपसा सुरु असुन याकडे जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले यांनी लक्ष घालुन वाळू उपसा बंद करावा अशी मागणी पेडगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी बोलताना पेडगाव ग्रामस्थ म्हणाले आमचे गाव ऐतिहासिक वारसा लाभलेले आहे. हे भिमानदीच्या काठी असुन हे पवित्र ठिकाणी असुन येथे नदीचे पात्र सर्वात मोठे रुंद असल्यामुळे संपूर्ण गाव नदीकाठी वसलेले असुन भिमानदीला मोठा पूर येऊन गेल्यानंतर नदीपात्रात चांगले पाणी वाहत असताना शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी येथील बंधारे आडवून ठेवले होते, तेव्हा नदीत जाता येत नव्हते पण वाळू उपशासाठी बंधाऱ्यातील पाणी सोडून देवून वाळू तस्करांनी नदीच्या कडेला जेसीबी.पोकलेनच्या साह्याने काठावरील माती बाजुला करुण मातीखालची वाळू जेसीबीच्या साह्याने रात्रदिवस वाळू काढून दररोज सुमारे ५० ते ६० ट्रक. टॕक्टर.भरुण वाहतुक करीत असल्यामुळे नदीचे पात्र आणखी मोठे आणि खोल होत आहे. याच वाळू वाहतूकीचे रस्त्याची चाळन होवून मोठमोठे खड्डे पडून रस्त्यावर अपघात वाढले आहेत. याला जबाबदार येथील महसुलचे अधिकारी बरबटलेली यंत्रणा आहे कारण गावाने विरोध केला तर ते सांगतात आम्ही फुकट वाळूउपसा करीत नाही तर प्रत्येक अधिकाऱ्यांना कामगार तलाठ्या पासून ते वरिष्ठापर्यत महिन्याकाठी पाकीटे देतो तेव्हा वाळू काढतो त्यामुळे नदीपात्रात जेसीबी .पोकलेनच्या साह्याने वाळू ट्रॕक्टरमध्ये चाळून बाहेर आणून स्टाॕक करतात व तेथून जेसीबी च्या साह्याने चार ब्रास वाळू पंधरा हजार रुपयेला एक ट्रक भरुण दिला जातो आणि त्यातुन दररोज मोठ्या प्रमाणात वाळू पुणे जिल्ह्यात ट्रक,हायवा यासारख्या मोठ्या वाहनातून भरुण जाते आणि विरोध केला तर मात्र वेगवेगळ्या प्रकारे घरी येवून दमबाजी केली जाते. त्यामुळे यांना मात्र कोणी विरोध करीत नाही कारण प्रत्येक जेसीबी.पोकलेन.ट्रॕक्टर.व ट्रक यांना वेगवेगळ्या प्रकारचे महिन्याला हप्ते ठरवून दिले आहेत आणि प्रत्येक वाळू तस्कराने जेसीबी,पोकलेन हे भाडे तत्वावर आणलेले असुन पाच ते दहा हजार रुपये रोजाने वापर केला जातो. त्यामुळे महसुल मधील कोणताच अधिकारी इकडे कार्यवाही साठी फिरकत नाही.प्रत्येकांचे पाकिट आठवड्याला पोहच होते मग यांना विरोध कोण करणार विरोध केला तर आमचे कोणी काही करु शकत नाही कारण महिन्याला महसुलच्या अधिकाऱ्यांना आम्ही एका जेसीबी मागे ऐंशी हजार व टॕक्टर पंचवीस हजार या प्रमाणे पाकिट देतो तेव्हा वाळू उपसा करतो असे वाळूतस्कर खुलेआम सांगतात अशा पध्दतीने जर राजरोस पणे चोरीच्या मार्गाने वाळू उपसा सुरु असेल तर त्यांना पायबंद कोण घालणार कामगार तलाठ्यापासून ते पोलिस,तहसिलदार एल.सी.बी. डी.वाय.एस.पी. यांना यांच्या पर्यत मलिदा पोहच होत असल्याने याभागात कार्यवाही होताना दिसत नाही त्यासाठी जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले यांनी या भागातील वाळू उपसा बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी पेडगाव येथील ग्रामस्थानी केली आहे.
चौकटः तहसिलदाराचा कारवाईत बेबनाव का ?
तहसीलदार साहेबांना फोन केला असता ते म्हणतात मी लगेच पथक पाठवतो पण पथक काय जागेवर लवकर जात नाही वाळूतस्करी काय बंद होत नाही
तहसीलदार साहेब म्हणतात माझ्याभोवती वाळू तस्करांचा गराटा असून तस्कर माझ्यावर पाळत ठेवतात मग ही वाळूतस्करी बंद कोण ठेवणार यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनाच लक्ष घालावे लागणार जिल्ह्यातील मंत्री राज्याच्या मंत्री मंडळात महसूल खाते सांभाळतात त्याच्याच जिल्ह्यात अशी अवस्था हे दुर्दैव असा प्रश्न पेडगाव येथील नागरिकांना पडला आहे.