आळंदीत शिवसेनेने वज्रमुठ आवळली…माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांची उपतालुका प्रमुख पदी वर्णी*

*आळंदीत शिवसेनेने वज्रमुठ आवळली…माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांची उपतालुका प्रमुख पदी वर्णी*
आळंदी शहराचे मा नगराध्यक्ष श्री रोहिदास भाऊ तापकीर यांची शिवसेना (मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे) खेड उपतालुका प्रमुख म्हणून सार्थ निवड झाल्याबद्दल *शनिवारी दि २७/५/२०२३* रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधीस अभिषेक व महापूजा करण्यात आली. आळंदी नगरपरिषदेत पूर्वी शिवसेनेचा नगराध्यक्ष त्यात नगराध्यक्षाला उपतालुकाप्रमुख पदी वर्णी देत आळंदी नगर परिषदेला टार्गेट करत भगवा फडकवण्याचा मिशन आखले जात आहे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रमुख शिवसैनिक यांनी कंबर कसली असून उद्योग बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची गती कमालीची वाढलेली दिसली उत्तम संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीची सचोटी यावर शिवसेनेचे यश आळंदी मध्ये एकवटल्याचे दिसून आले आळंदी शहरांमध्ये विविध पक्षांचे पदाधिकारी पक्ष कार्य करत असतात परंतु शिवसेनेची संघटन कौशल्यता ही वाखानण्याजोगी असते, त्याची प्रचिती पुन्हा आली. रोहिदास तापकीर यांच्या रूपाने तालुक्याला मिळालेला उप तालुकाप्रमुख आणि आळंदी तीर्थक्षेत्रातील एक माजी नगराध्यक्ष याचा भविष्यातील खेड तालुक्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेला किती फायदा होतो हे पाहणे उत्सुकतचे ठरेल. परंतु भविष्यात ही वज्रमुठ धीली पडली. तर मात्र इतर पक्षांना याचा फायदा होईल आणि शिवसेना त्यांचं कार्य कौशल्य, संघटन बाबत किती प्रबळ ठरतात हे येणारा काळ ठरवणार आहे.कडवट शिवसैनिक , शिवसेना आळंदी शहर पदाधिकारी, महिला आघाडी , युवासेना पदाधिकारी व सर्व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री शिवाजी वर्पे (उपजिल्हाप्रमुख)रामदास धनवटे(खेड तालुकाप्रमूख), किरण गवारे(उपतालुकाप्रमुख) उत्तम गोगावले(जेष्ठ शिवसैनिक), रमेश गोगावले, (मा.नगरसेवक)प्रफुल प्रसादे ,शशिकांत राजे जाधव(उपशहरप्रमुख) मनोज पवार(युवासेना शहरप्रमुख) तुकाराम माने गुरुजी,अनिकेत डफळ(प्रसिध्दी प्रमुख) निखिल तापकीर(युवासेना उपशहरप्रमुख) दत्ता तापकीर ,आशीष गोगवले,तुषार तापकीर,महिला आघाडी अनिताताई झुझुम, आणि सर्व ग्रामस्थ आळंदी देहुफाटा ,भारती.वाघमारे.आनीता.शिंदे..शुंभागी.यादव,. शैलाताई.ताफकीर.संगीता.मेटे.वनीता..हुंडारे. उपस्थित होते