पेराल तेच उगवेल. जसे कर्म करू तसे फळ मिळते-सूर्यभान वडितके

पेराल तेच उगवेल. जसे कर्म करू तसे फळ मिळते-सूर्यभान वडितके
पेराल तेच उगवेल. जसे कर्म करू तसे फळ मिळते असे उदगार उक्कलगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सूर्यभान वडितके यांनी काढले. उक्कलगाव प्राथमिक शाळेचे शिक्षक पुंजाहरी विठ्ठल सुपेकर यांच्या सेवा पूर्ती कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
पुंजाहरी सुपेकर यांनी शिक्षण क्षेत्रातील ३२ वर्षे सेवा पूर्ण करून ते सेवानिवृत होत आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी उक्कलगाव केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचा सेवा पूर्ती गौरव सोहळा उक्कलगाव येथे संपन्न झाला. यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीम खान पठाण , शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब सरोदे, विकास मंडळाचे विश्वस्त प्रदीप दळवी, रमेश शिंदे, राजू थोरात, रमेश वारूळे, तुषार सुपेकर यांच्या सह सुपेकर सरांचे नातेवाईक व मित्र परीवारासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वडितके पुढे म्हणाले की , तळागाळातील गोरगरीबांची मुले शिकली पाहिजेत , विविध शासकिय योजना गरजू विद्याथ्र्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत यासाठी सुपेकर सरांनी प्रामाणिक पणे आपली सेवा दिली. त्यामुळे वंचित घटकातील अनेक मुले आज समाजात स्थीर स्थावर झाली आहे. त्यांच्या पुण्याईमुळेच सरांची मुलेही चांगल्या पदावर जावून पोहचली आहेत. संस्कार शील कुटूंब म्हणून सुपेकर सरांकडे बघता येईल.
यावेळी तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने भेट वस्तू व स्नेह वस्त्र देवून गौरव करण्यात आला. शिक्षक बॅंकेच्या वतीनेही स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सुपेकर सरांच्या खडतर आयूष्यासंबधी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी सलीमखान पठाण, बाळासाहेब सरोदे, प्रदीप दळवी, रमेश वारुळे , शोभा शेंडगे, कविता गायकवाड, तुषार सुपेकर, प्रशांत बोरूडे, मारूती वाघ, मनिषा साठे, अविनाश साठे, सोमनाथ अनाप, विजय बागुल, संजय साळवी, रज्जाक शेख , गोत्राळ , सूर्यभान वडितके, पुंजाहरी सुपेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप अंत्रे , रघुवीर गायके, योगेश कोते, रविंद्र पाटोळे, एकनाथ रहाटे, विठ्ठल निबे, डॉ. जैन, चेतना शिवशरण, रविंद्र काळे, रविंद्र वाघ, विनित चांदेकर, ज्योती तोरणे, ज्ञानेश्वर तावरे,
यांचे सह अनेकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोकुळ औटी व आभार प्रदर्शन संदीप अंत्रे यांनी केले.