बेलापूरातील अधैव व्यवसाय तातडीने बंद करण्याची सरपंचासह ग्रामस्थांची मागणी

बेलापूरातील अधैव व्यवसाय तातडीने बंद करण्याची सरपंचासह ग्रामस्थांची मागणी
अवैध व्यवसायामुळे गावाची शांतता धोक्यात आली असुन गावात सुरु असलेले अवैध व्यवसाय मटका गुटखा त्वरीत बंद करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थासह बेलापुर पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसण्याचा इशारा बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी दिला आहे . या बाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पाठविलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की बेलापुरगाव हे सुसंस्कृत गाव असुन गावात सुरु असलेल्या अवैध व्यवसायामुळे गावाची शांतता धोक्यात आलेली आहे आनेक गुन्हेगारांचा वावर गावात वाढला आहे शासनाने वाळू खूली केल्यामुळे वाळू तस्करी करणारे वाळू तस्कर आता अवैध व्यवसायाकडे वळू लागले आहे गावात काही मोठी घटना घडण्या आगोदर हे अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे असे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिले होते त्यामुळे काही काळ हे व्यवसाय बंद राहीले आता पुन्हा काहींनी मध्यस्थी करुन नव्या जोमाने अवैध व्यवसाय सुरु केले असुन अनेक तरुण मुले विद्यार्थी कष्टकरी मजुर अवैध व्यवसायाच्या अहारी जात आहे मटका गुटखा दारु यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे तरी आपण गावातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच महेंद्र साळवी यांनी केली असुन हे व्यवसाय दोन दिवसात बंद न केल्यास आपण ग्रामस्थासह बेलापुर पोलीस स्टेशन येथे उपोषणास बसु असा इशाराही सरपंच साळवी यांनी दिला आहे या निवेदनाच्या प्रति मा मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री महसुल तथा पालकमंत्री पोलीस महासंचालक जिल्हाधिकारी अहमदनगर अप्पर पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर यांना पाठविण्यात आलेल्या आहेत