महाराष्ट्र दिनापासून सुरु झालेल्या श्रीरामपुर मुंबई या बस सेवेचे बेलापूरात स्वागत

महाराष्ट्र दिनापासून सुरु झालेल्या श्रीरामपुर मुंबई या बस सेवेचे बेलापूरात स्वागत
श्रीरामपुर बस स्थानकातुन श्रीरामपुर मुंबई रातराणी बस सेवा महाराष्ट्र दिन १ मे पासुन सुरु करण्यात आली असुन या बसचे बेलापुर व्यापारी प्रवासी संघटना ग्रामस्थ पत्रकार यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन श्रीरामपुर डेपोमधुन श्रीरामपुर ते मुंबई रातराणी बस सेवा बेलापुर कोल्हार लोणी संगमनेर नाशिक मार्गे मुंबई ही बससेवा पूर्ववत सुरु करण्यात आलेली आहे गेल्या चार वर्षापासून ही रातराणी सेवा बंद करण्यात आलेली होती त्यामुळे ही सेवा पूर्ववत सुरु करावी आशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती या बाबत प्रवासी संघटनेने सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर महाराष्ट्र दिनी ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे ही बस बेलापुर बस स्थानकावर येताच श्रीरामपुर बस डेपोचे व्यवस्थापक महेष कासार वाहक बापु मोरे चालक कल्याण तांबे प्रवासी मित्र बोरावके यांचा प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड गोरख बारहाते बाजार समितीचे संचालक अभिषेक खंडागळे सुधीर नवले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा यांनी सत्कार करुन पेढे वाटले या वेळी माजी सरपंच भरत साळूंके सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक शेख शफीक आतार भाजपाचे प्रफुल्ल डावरे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले राजेश खटोड दत्ता कुऱ्हे केशवराव कुऱ्हे बाबासाहेब भांड राजेंद्र बाठीया विजय कटारीया मनोज मुथा राजेंद्र गोरे अतिष देसर्डा रामेश्वर सोमाणी दत्तात्रय काशिद वैभव गायकवाड महेष गोरे प्रशांत बिहाणी संक्रापुरचे माजी सरपंच संजय जगताप कल्याणराव जगताप रामराव होन उपस्थित होते प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी बेलापुर बस स्थानकावर वहातुक प्रमुख नियुक्त करण्यात यावा ग्रामिण भागात मुक्कामी जाणारी बससेवा पूर्ववत सुरु करावी डेपोला नविन बस मिळणे बाबत मागणी करावी अशा मागण्या व्यवस्थापक कासार यांच्याकडे केल्या मुंबई रातराणी बससेवा सुरु करणेबाबत नगर विभागाचे विभाग नियंत्रक श्रीमती मनिषा सपकाळ विभागीय वहातुक अधीकारी आनिल भिसे यांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल प्रवासी संघटनेच्या वतीने श्रीगोड यांनी त्यांना धन्यवाद दिले