राजकिय

आर्थिक नियोजनाच्या ग्रामसभेवरुन बेलापुरच्या ग्रामसभेत गरम गरमी सत्ताधारी विरोधकही आक्रमक

आर्थिक नियोजनाच्या ग्रामसभेवरुन बेलापुरच्या ग्रामसभेत गरम गरमी सत्ताधारी विरोधकही आक्रमक

 

 

 

बेलापुर (प्रतिनिधी )- आर्थिक नियोजना बाबत बेलापुर ग्रामपंचायतीने केव्हा ग्रामसभा घेतली? विरोधी सदस्यांना का बोलविले नाही ?त्या सभेचा अजेंडा दाखवा ? म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला यावर सरपंच-उपसरपंच यांनी आक्रमक होत प्रतिउत्तर दिले. गरमा-गरमीच्या वातावरणात जि प सदस्य शरद नवले यांनी मध्यस्थी करुन वादावर पडदा टाकल्यामुळे ग्रामसभा शांततेत पार पडली बेलापुर ग्रामपंचायतीची ग्रामसभा मराठी शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आली होती ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी मागील सभेचे प्रोसिडींग वाजण्यास सुरुवात केली त्या वेळी ही सभा केव्हा घेतली आम्हाला निरोप का दिला नाही ?असा सवाल सदस्य भरत साळूंके, रविंद्र खटोड यांनी केला त्यावर वाद सुरु झाला या वादात उपसरपंच अभिषेक खंडागळे प्रफुल्ल डावरे मोहसीन सय्यद यांनी तुम्ही मागे काय केले ते पण सांगा अशी विचारणा करताच वातावरण चांगलेच तापले त्यामुळे पोलीस देखील तातडीने ग्रामसभेस उपस्थित झाले. जि प सदस्य शदर नवले यानी काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करु असे सांगुन तो विषय थांबविला त्या नंतर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या १५% निधी मागासवर्गीयासाठी खर्च करणे हा नियम असताना तो का केला नाही असा सवाल विजय शेलार यांनी केला.चंद्रकांत नाईक यांनीही दलीत वस्तींना न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी मागील सत्ताधाऱ्यांच्या काळातील मागसवर्गीय निधी वाटप झालेले नाही असा खुलासा केला.प्रफुल्ल डावरे यांनी अनेक ठिकाणी नविन बांधकाम झालेली असुन त्याचे रिव्हीजन करा वा नविन नियमानुसार आकारणी करा जेणेकरुन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढेल अशी मागणी केली.हाजी इस्माईल शेख यांनी गावातील रस्त्यावरील अतिक्रमण गोविंद वाबळे व राकेश कुंभकर्ण यांनी फ्लेक्स बोर्डाबाबत नियम बनवावेत कलेश सातभाई, संजय रासकर यांनी सातभाई वसाहतीतील स्मशानभुमीचा लागलेला फेर कसा रद्द झाला अशी विचारणा केली. याबाबत सरपंच महेंद्र साळवी यांनी सदरचा फेर २०१० सालीच रद्द झालेला असून जागा ताब्यात घेण्या याबाबत कार्यवाही करू असे सांगितले.या वेळी पत्रकार देविदास देसाई यांनी बेलापुर ग्रामपंचायतीचे शतक महोत्सवी वर्ष असुन पाणी पुरवठा योजनेकरीता १२६ कोटी रुपये निधी मिळविणारी पहीली ग्रामपंचायत ठरली असुन या योजनेकरीता पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा खासदार सदाशिव लोखडे आमदार लहु कानडे तसेच दिपक पटारे, शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. टाळ्याच्या गजरात त्यास मंजुरी देण्यात आली मा ,जि प शरद नवले यांनी १२६ कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेची सविस्तर माहीती दिली पाणी पुरवठा योजनेकरीता जमीन मिळावी या करीता उच्च न्यायालयात दावा दाखल करणारे विलास मेहेत्रे संजय शिरसाठ मुस्ताक शेख यांचा सत्कार करण्यात आला तसेच नविन पाणी पुरवठा योजनेतील टाक्यासाठी जागा देणारे माधव कुऱ्हे प्रकाश मेहेत्रे नामदेव मेहेत्रे मनोज मेहेत्रे जनार्धन दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी तबस्सुम बागवान सौ शिला पोळ स्वाती आमोलीक प्रियंका कुऱ्हे जालींदर कुऱ्हे प्रकाश नवले लहानु नागले भाऊसाहेब तेलोरे दत्ता कुऱ्हे प्रकाश नवले प्रभाकर कुऱ्हे विशाल आंबेकर अमोल गाढे अजिज शेख अय्याज सय्यद जाकीर शेख भाऊसाहेब कुताळ महेश कुऱ्हे सचिन वाघ सुरेश कुऱ्हे आदिसह ग्रामस्थ महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते नेहमीत शांत व संयमी असणारे सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा आक्रमक पवित्रा पहिल्यादाच विरोधकांनी अनुभवला.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे