गुन्हेगारी

मुलांच्या टोळक्या कडुन युवकास जबर मारहाण पोलिसांनी केली दोघांना अटक 

मुलांच्या टोळक्या कडुन युवकास जबर मारहाण पोलिसांनी केली दोघांना अटक 

 

आरोपींवर जिवे मारण्याच्या प्रयत्ना सह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल 

 

मारहाणीच्या निषेधार्थ कर्जत शहरात कडकडीत बंद 

 

कर्जत प्रतिनिधी – राशीन येथील कार्यक्रमासाठी निघालेल्या तरुणाला बारा ते चौदा जणांनी येऊन जातीवाचक शिवीगाळ करत तलवारीने मारहाण केल्याची घटना दि.४ रोजी सायंकाळी कर्जत मधे घडली आहे.याबाबत अमित राजेंद्र माने, रा कर्जत यांनी कर्जत पोलिसात फिर्याद दिली आहे.

 

       हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रतीक उर्फ सनी राजेंद्र पवार असे असून त्याच्यावर नगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी अमित माने व सनी पवार हे राशीन येथील कार्यक्रमासाठी  मोटारसायकलवर जाणार होते. परंतु कार्यक्रमासाठी आणखी मित्र येणार असल्याने ते राशीन रोड येथील अक्काबाई मंदिरापासून जवळील चौकात मेडिकल शेजारी उभे होते.त्यावेळी एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट व एक काळ्या रंगाची बुलेट तसेच एक लाल रंगाची पल्सर,एक पांढऱ्या रंगाची वेस्पा स्कुटी यावर बारा ते चौदा युवक आले. त्यांनी फिर्यादीच्या सोबत असलेल्या सनी पवार यास ‘ये मांगट्या, तुला लय जास्त किडा आहे काय? असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यातील शाहरुख खान पठाण, सोहेल खान पठाण, निहाल, खान पठाण इलाईल शेख, टिपू पठाण, अब्रार उर्फ अरबाज कासम पठाण, अर्षद पठाण, अकीब सय्यद यांनी सनी पवार या युवकास लाकडी दांडकयाने, कोयता, तलवार व मोटारसायकलच्या लोखंडी शॉकाब्सर, हॉकी स्टिक, दगड, अशा साधनांनी मारहाण केली.  वरील सर्व आरोपी (रा. कर्जत)  व इतर त्यांच्यासोबत अनोळखी पाच ते सात इसम होते. फिर्यादी व सनी पवार हे दोघेच असल्याने या सर्वांना त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला.मात्र ते सर्वजण अंगावर धावून येत होते.’ तुझा आम्ही खूण करू करू’ असे म्हणत शाहरुख खान पठाण व इतरांनी  सनी पवार यास मारहाण केली. डोक्यातून रक्त येत असल्याने तो खाली कोसळला.फिर्यादीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता इलाईल शेख याने त्यांनाही मारहाण केली. अब्रार पठाण याने फिर्यादिस खाली ढकलले व हाताने उजव्या डोळ्यावर फटका मारला. सर्व आरोपी तेथून निघून गेल्यानंतर फिर्यादीने मित्रांना बोलावून सनी यास कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.सनी हा गंभीर जखमी असल्याने त्यास पुढील उपचाराकामी नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.फिर्यादीवरून सर्व आरोपींवर कर्जत पोलीस ठाण्यात एकूण १३ ते १४ आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, भगवान शिरसाठ, पोलीस जवान संभाजी वाबळे, भाऊ काळे, मनोज लातूरकर, शाम जाधव, शाहूराज तिकडे, बळीराम काकडे यांनी घटनास्थळ गाठले व त्यानंतर सरकारी दवाखान्यात जखमीची विचारपूस करून आरोपींचा शोध सुरू करुन नाकाबंदी लावली. मिरजगाव तसेच श्रीगोंदा, नगर तालुका, भिंगार कॅम्प पोलिसांना तसेच स्थानिक नागरिकांना ग्रामसुरक्षायंत्रणेद्वारे माहिती देऊन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आवाहन केले आणि गुन्ह्यातील वरील आरोपींपैकी २ आरोपींना कर्जत पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. घटनास्थळास उपविभागीय पोलिस अधिकारी  अण्णासाहेब जाधव यांनी भेट दिली असून अपर पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल यांनी नगर येथे जखमीची विचारपूस केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास  कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे करत आहेत.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे