राजकिय

श्रीरामपूर तालुक्यातील या ग्रामपंचायत मधील सदस्यत्व रद्द जिल्हाधिकारी डाँ. भोसले यांचा आदेश

 श्रीरामपूर तालुक्यातील या ग्रामपंचायत मधील सदस्यत्व रद्द जिल्हाधिकारी डाँ. भोसले यांचा आदेश

 

 

सुनिता बर्डे यांचे बेलापुर ग्रामपंचायत  सदस्यत्व रद्द जिल्हाधिकारी डाँक्टर भोसले यांचा आदेश

 

 

-बेलापुर बु ग्रामपंचायत निवडणूकीत अनुसुचित जमाती महिला या जागेवर निवडून आलेल्या सुनिता राजेंद्र बर्डे यांचे जात प्रमाणपत्रच रद्द झाल्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द ठरविल्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसलै यांनी काढला असुन या निकालामुळे जनता विकास आघाडीला धक्का बसला आहे.

 

बेलापुर ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२१ मध्ये झाली होती त्यात प्रभाग क्रमांक चार मधुन अनुसुचित जमाती महिला जागेकरीता गावकरी मंडळाच्या वतीने सौ.कमल भगवान मोरे तर जनता विकास आघाडीच्या वतीने सौ.सुनिता राजेंद्र बर्डे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत सौ कमल भगवान मोरे यांचा पराभव झाला. या निवडणूकीत जनता विकास अघाडीला सहा जागा तर गावकरी मंडळाला अकरा जागा मिळाल्या होत्या.

 

या वेळी सौ कमल मोरे यांनी जात पडताळणी कार्यालय नाशिक येथे अर्ज करुन बर्डे यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्यामुळे जात पडताळणी देवु नये अशी मागणी केली होती. सौ.मोरे यांच्या अर्जाची दखल घेवुन तो अर्ज चौकशी कामी उपविभागीय कार्यालय श्रीरामपुर येथे पडताळणीसाठी पाठविण्यात आला.श्रीरामपुर येथील उपविभागीय अधिकारी यांना जातीच्या दाखल्या सोबत जोडलेले पुरावे चुकीचे असल्याचे निदर्शनास आले.

 

त्यामुळे उपविभागीय कार्यालयाने सौ. सुनिता बर्डे यांचे जात प्रमाणपत्र दिनांक १०आँक्टोबर २०२२ रोजी रद्द केले व तसा चौकशी अहवाल जातपडताळणी कार्यालयास कळविला तसेच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र आदेश क्र/रानिआ/मनपा/२००७ / प्रक्र६ /क-५दिनाक ३ आँक्टोंबर २००७ मधील मुद्दा क्रमांक ३ नगरपरिषद व नगर पंचायत व ग्रामपंचायत यांच्या बाबतीत ज्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे त्यांच्या बाबतीत अनर्हतेचे आदेश जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचे कळविल्यापासून त्वरीत व जास्तीत जास्त १५ दिवसाचे आत सदस्यत्व रद्द करुन संबधीताना बजवावा कुठल्याही सदस्याचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास ते तात्काळ जिल्हाधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे त्या नुसार जात पडताळणी कार्यालयाने ते पडताळणी देणे शक्य नसल्याचे कळविले.सौ.बर्डे यांचे जात प्रमाणापत्रच रद्द झाल्याने जिल्हाधिकारी डाँक्टर राजेंद्र भोसले यांनी त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पदच रद्द केले आहे.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे