विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून नामदार शंकरराव गडाख यांचा वाढदिवस साजरा.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून नामदार शंकरराव गडाख यांचा वाढदिवस साजरा.
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार श्री शंकरराव पाटील गडाख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घोडेगाव ता.नेवासा येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्रातील गरजवंत अश्या मुलांना शैक्षणिक शालेय साहित्य व खाऊचे वाटप नामदार शंकरराव गडाख मित्र मंडळ व माजी सरपंच संदिप कुऱ्हाडे मित्र मंडळ घोडेगाव यांच्या वतीने करण्यात आले. अनावश्यक खर्चाला फाटा देत उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केला गेला,उपस्थित लहानग्यांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी ग्रा.प.सदस्य वसंतराव सोनवणे, अविनाश येळवंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
उपस्थित शाळकरी मुले व लहान मुले यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद पाहून कार्यक्रमाचे सार्थक झाल्याची भावना सरपंच संदीप कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली.
यावेळी घोडेगाव ग्रामपंचायतीचे मा.सरपंच संदीप कुऱ्हाडे, ग्रा.प. सदस्य वसंतराव सोनवणे, ग्रा.प. सदस्य अनिल सोनवणे, मनोज नहार,भाऊराव जाधव,किशोर लोंढे,शकील शेख,विष्णू चौधरी,पत्रकार अविनाश येळवंडे, अनिल पटारे ,बाळासाहेब लोंढे,लहाणू ठोंबरे व महात्माफुलें बालसंगोपन केंद्राचे प्रमुख काशिनाथ चौघुले हे उपस्थित होते.
महात्मा फुले बालसंगोपन केंद्रावर मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करताना संदिप कुऱ्हाडे, वसंतराव सोनवणे व इतर मान्यवर.