डाँ. तनपुरे सहकारी कारखान्याचे माजी संचालक यांच्या बंगल्यावर धाडसी दरोडा

राहुरी तालुक्यातील ब्रांम्हणगाव भांड येथिल डाँ. तनपुरे सहकारी कारखान्याचे माजी संचालक रमेश वारुळे यांच्यासह त्यांच्या भावाच्या बंगल्यावर अज्ञात 6 ते 7 दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकुन १४ तोळे सोने व 45 हजाराची रोख रक्कम असे एकुण 6 लाख 05 हजाराचा ऐवज दरोडेखोरांनी लुटुन नेला. दरोडा पडत असताना घरातील महिला उठली असताना चोरट्याने सत्तूर दाखवून धमकावत हा दरोडा घातला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवारी पहाटेच्या दरम्यान रमेश वारुळे यांच्या ब्राम्हणगाव भांड येथील बंगल्याच्या मागील दरवाज्याचा कडी-कोंडा तोडून अज्ञात 6 ते 7 दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून कपाट फोडून सामानाची उचकापाचक करत घरातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली आहे.तर रमेश वारुळे यांच्या भावाच्या घरातील कपाटच या चोरट्यांनी उचलुन नेऊन जवळच्या शेतात फोडुन त्या कपाटातील रोख रक्कम व दागिणे लुटुन नेले आहे.
दरोडेखोर ज्यावेळी घरात घुसले त्यावेळी घरातील पुरुष व्यक्ती शेतात पाणी धरीत होते.दरोडेखोर स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून आत शिरले उचकापाचक करीत असताना घरातील एक महिला दरोडेखोर ज्या खोलीत चोरी करीत होते.त्या खोलित गेली असताना दरोडेखोरांनी सत्तुर सारख्या धारदार शस्ञाचा धाक दाखवत एका खोलित जाण्यास सांगितले. दरोडेखोर अंदाजे 20 ते 25 वयोगटातील होते.दरोडेखोरांनी रमेश वारुळे व त्यांच्या भावाच्या घरात धुमाकुळ घातला.दरोडेखोरांनी घरातील एक कपाट उचलून नेवून शेतात फोडले.घरातील तरुण मुलगा घराच्या गच्चीवर झोपलेला होता.दरोडेखोरांनी जिण्याचा दरवाजा बंद करुन ठेवला होता.
दरोड्याची माहिती समजताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रताप दराडेयांनी धाव घेतली. श्वान व ठसे तज्ञ पथकास पाचारण करण्यात आले. घटनास्थळी एका दरोडेखोराच्या पायातील सँडेल मिळून आले. त्या सँडलचा श्वानास वास देण्यात आल्यानंतर वारुळे यांच्या घरा पासुन चांदेगाव शिवे लगत सुमारे 1 कि.मी पायवाटेने दरोडेखोर आले गेले आहे. त्या ठिकाणी प्लसर मोटारसायकलच्या टायरची नकशी दिसत असल्याने हे दरोडेखोर तेथुन वाहनाने पसार झाले आहे.तर ठसे तज्ञ यांना चार ते पाच ठिकाणी ठसे मिळाले आहेत.घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी भेट दिली.पो.हे.काँ.पी.बी.शिरसाठ,भिताडे, पो.काँ.शशिकांत वाघमारे, सागर माळी, अदिनाथ पाखरे आदींनी भेट देवून पंचनामा केला.
राहुरीत भेळीचे दुकान फोडून 45 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला
ब्राम्हणगावभांड येथे दरोडा पडलेला असताना ……दुसरीकडे राहुरी शहरात देखील एका फरसाण (भेळीचे) दुकानाची भिंत फोडून तेलाचे डबे, फरसाण व रोख असा अंदाचे ४५ हजाराच्या मुद्देमालावर डल्ला मारला… त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी राञीची गस्त वाढवावी आशी मागणी नागरीकांतून केली जात आहे.