राहुरी मतदारसंघातील गावांकरीता घनकचरा ,सांडपाणी व्यवस्थापण करीता 3 कोटी 27 लक्ष 40 हजार निधी मंजुर

राहुरी मतदारसंघातील गावांकरीता घनकचरा ,सांडपाणी व्यवस्थापण करीता 3 कोटी 27 लक्ष 40 हजार निधी मंजुर
स्वच्छ भारत अभियान मिशन ग्रामिण महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागां अंतर्गत राहुरी विधानसभा मतदार संघातील 11 गावांकरीता घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाटी 3 कोटी 27 लक्ष 40 हजार 440 रुपयांचा निधी मंजुर झाला असल्याची नगरविकास उर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील याचेकडे मंत्री तनपुरे यांनी सातत्याने पाठपुरावा करत मंजुरी प्राप्त करुन घेतली यात वांबोरी – 1 कोटी 57 लक्ष 6 हजार 128 रुपये व नगर तालुक्यातील जेऊर साठी – 7 6 लक्ष 48 हजार 472 रुपये तसेच पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे – 6 लक्ष 28 हजार , चिचोंडी – 10 लक्ष 38 हजार 580 रुपये, धामोरी खु – 6 लक्ष 21 हजार 975 रुपये, सडे – 13 लक्ष 71 हजार 545 रुपये , वळण – 13 लक्ष 32 हाजर 154 रुपये , खडांबे खु – 14 लक्ष 62 हजार 129 रुपये , बाभुळगांव – 8 लक्ष 37 हजार 414 रुपये, तांदुळनेर – 568 लक्ष 68 हजार 566 रुपये , तांभेरे – 15 लक्ष 24 हजार 550 रुपयांचा निधी तीन टप्यात येणार असुन पहिला टप्पा 30 टक्के ,दुसरा टप्पा 50 टक्के व तिसरा टप्पा 20 टक्के रक्कम पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडुन येणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.
राहुरी मतदार संघातील 11 गावांमध्ये दिवसेदिवस वाढते नागरीकरण यामुळे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापणाकरीता स्वतंत्र निधी द्यावा असी मागणी ग्रामपंचायातीनी मंत्री तनपुरे यांचेकडे केली होती.त्यानुसार पहिला टप्प्यात हा निधी प्राप्त झाला असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. या 11 गावांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापणाकरीता निधी मिळावा यासंबधी राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचकडे मंत्री तनपुरे यांनी वेळोवेळी मागणी करुन पाठपुरावा केला होता.
या गावामध्ये 3 कोटी 27 लक्ष 40 हजार 440 रुपयांचा निधी मंजुर केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासुन महत्वपुर्ण अशी मागणी मंत्री तनपुरे यांनी पुर्ण केल्याने मतदार संघातील गावांनी तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक